Covid 19 Vaccine Covid 19 Vaccine
सातारा

कोरोना लसीकरणात महिला मागेच!

कोयनानगर परिसरातील वास्तव; भीतीमुळे उदासीनता, जनजागृतीची गरज

विजय लाड

कोयनानगर (जि. सातारा) : कोरोनाच्या लसीकरणात कोयना विभागातील महिलांत प्रचंड उदासीनता व भीती दिसून येत आहे. कोयना विभागात आतापर्यंत महिलांच्या लसीकरणाचे शतकही ओलांडले नाही. फक्त 83 महिलांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. सर्वत्र "लेडीज फर्स्ट' असताना लसीकरणात कोयना विभागात मात्र "लेडीज लास्ट' असल्याचे चित्र दिसत आहे.

कोयनानगर परिसरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्याला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासनाने लसीकरण सुरू केले आहे. काळोली ते घाटमाथापर्यंत कार्यक्षेत्र असणाऱ्या हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात 25 हजार लोकसंख्या येते. कोयना विभागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज सहापेक्षा जादा पॉझिटिव्ह रुग्ण कोयना व आजूबाजूच्या परिसरात सापडत असल्याचे वास्तव आहे. दुसऱ्या लाटेमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 46 रुग्ण सापडले आहेत. त्यात 18 महिलांचाही समावेश आहे. 10 मार्चपासून कोयना विभागात हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून ठिकठिकाणी लसीकरण सुरू आहे. आरोग्य विभागाने कोव्हॅक्‍सीन लशीचे 70 डोस, तर कोव्हिशिल्डचे दोन हजार 140 डोस आले आहेत. त्यातील दोन हजार 46 डोस पुरुषांना, तर 83 डोस महिलांना असे एकूण दोन हजार 154 डोस देण्यात आले आहेत. या लसीकरणामध्ये महिलांचे प्रमाण कमी आहे. हे प्रमाण वाढवण्यासाठी तालुका प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवण्याची गरज आहे. लशीची भीती दूर करण्यासाठी महिलांचे प्रबोधन करण्यासाठी आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविकांनाच प्रयत्न करावे लागणार आहेत.

काळजात धडकी भरवणाऱ्या वायरमनच्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

महिलांमध्ये जनजागृती तरीही...

प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबर प्रत्येक उपकेंद्राच्या ठिकाणीही लसीकरण कार्यक्रम सुरू आहे. त्याला चांगले सहकार्य होत असले तरी महिला वर्गाचा प्रतिसाद तितकासा मिळत नाही. महिलांचे लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांकडून जनजागृती सुरू आहे, अशी माहिती पाटण तालुका वैद्यकीय अधिकारी आर. बी. पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT