Vaccination esakal
सातारा

कऱ्हाडकरांनो! तुम्हाला फोन आला असेल, तरच गुरुवारी लसीकरणासाठी जा

आज साताऱ्यातही केवळ 5 हजार लस उपलब्ध झाल्याने बहुतांश लसीकरण केंद्रं (Vaccination Center) बंद होती.

सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : शहरात लसीचा तुटवडा आहे. उद्या (गुरुवारी) केवळ 20 कोव्हॅक्सिनची लस (Corona Vaccine) शहरात उपलब्ध राहणार असून कोरोना लस (Vaccination) घेणाऱ्यांची नोंदणी पालिकेने सक्तीची केली आहे. त्यामुळे पालिकेकडे नोंदणी झालेल्या 50 जणांना पालिकेने फोन करून कल्पना दिली आहे. तेवढ्याच लोकांना कोव्हॅक्सिनची दुसरी लस घेण्यासाठी पालिकेने बोलावले आहे. पालिकेच्या बुधवार पेठेतील नागरी आरोग्य केंद्रात लस दिली जाणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितलंय. (Covid19 Vaccination Karad Muncipal Council Satara Marathi News)

आज साताऱ्यातही केवळ 5 हजार लस उपलब्ध झाल्याने बहुतांश लसीकरण केंद्रं (Vaccination Center) बंद होती. सध्या साताऱ्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांनी लसीकरण वाढविण्याची मागणी केली आहे, त्यास जिल्हाधिकाऱ्यांनी देखील प्रतिसाद देत लसीकरण वाढविले जाईल, अशी ग्वाही दिलीय. त्यामुळे येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील लसीकरणात वाढ होणार आहे. कऱ्हाड शहरात देखील लसीकरणात टप्प्या-टप्प्याने वाढ होईल, असेही आरोग्य विभागाने सांगितले.

जिल्ह्यात 2881 नागरिकांना आज डिस्चार्ज

सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 2881 नागरिकांना आज सायंकाळपर्यंत घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

  • एकूण नमुने - 653889

  • एकूण बाधित - 141312

  • घरी सोडण्यात आलेले - 118818

  • मृत्यू - 3294

  • उपचारार्थ रुग्ण - 19185

Covid19 Vaccination Karad Muncipal Council Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

Mumbai News: उलट्यांचा भीषण परिणाम! दोन महिने वेदना, अखेर जीवदान; आधुनिक उपचारांनी अन्ननलिकेचे छिद्र भरले

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

कर्जत, लोणावळा अलिबागमध्ये आमचे १०० पेक्षा जास्त बंगले; मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, कसा सांभाळते बिझनेस?

SCROLL FOR NEXT