satara sakal
सातारा

ठाण्यातील अधिकाऱ्यावर भ्याड हल्ला; वाईत कर्मचाऱ्यांचे आंदोलन

ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे या महिला अधिकाऱ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ वाई पालिकेतील कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन केले

भद्रेश भाटे

वाई (सातारा) : ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे या महिला अधिकाऱ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ वाई पालिकेतील कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन केले. यावेळी संबंधित हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसीलदार रणजित भोसले यांना देण्यात आले.

ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे या कर्तव्य बजावताना एका माथेफिरूकडून त्यांच्यावर हल्ला झाला. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर झालेला हा भ्याड हल्ला संतापजनक आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करतात, तेव्हा अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ अधिकाऱ्यांचे नाही तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अशा हल्ल्याचा संघटित निषेध करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावरील उपाय आहे.

त्यामुळे या प्रकरणी अटक केलेल्या गुन्हेगारावर जलद गतीने खटला चालवून कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाकडून प्रयत्न व्हावेत, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. या घटनेचा निषेध म्हणून आज वाई नगरपालिकेचे संपूर्ण कामकाज बंद करण्यात येत आहे. यामध्ये सर्व कर्मचारी, अधिकारी वर्गाने सहभागी होऊन आपला निषेध नोंदविला आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.

या निवेदनावर कार्यालय अधीक्षक नारायण गोसावी, अभिजित ढाणे, रोशन गायकवाड, अनंत भारस्कर, राजेंद्र जाधव, सचिन धेडे, दीपाली साबळे, क्रांती वाघमळे आदी विभागप्रमुखाच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘आमदार-खासदार-कंत्राटदार’ राजकारण सुरू; महाराष्ट्रात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता... आकडेवारी देत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं

Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी'चा थरारक कुस्ती सामना! महेंद्र गायकवाड, बाळू बोडकेची विजयी सलामी; जमदाडेचं आव्हान संपुष्टात

Raj Thackeray: महाराष्ट्रावर ११ लाख कोटींचं कर्ज.. इराणबद्दल भूमिका अन् इन्स्टाग्राम रील्स; गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं मुद्द्यांवर बोट

गॅस सिलिंडर मिळेना, आता ‘या’ कुटुंबांना मिळणार रॉकेल! ग्रामीण भागासाठी निर्णय, सोलापूर जिल्ह्यात साडेचार लाख व्यक्तींची माहिती पाठविली, वाचा...

Unseasonal Rain : चुंगी परिसरात गारपीट आणि दर या दुहेरी संकटाने कांदा उत्पादक हवालदिल

SCROLL FOR NEXT