Crime  sakal
सातारा

Crime : धुळे-सोलापूर महामार्गावर धक्कादायक घटना! चाकूचा धाक दाखवून महिलेचे मंगळसूत्र लुटले

Dhule Solapur Highway: राञी उशारा पर्यंत या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात घेण्यात आलेली नव्हती.

सकाळ वृत्तसेवा

Ambad Crime : लेकिला भेटण्यासाठी छञपती संभाजीनगर येथे दुचाकीने रामगव्हाण ता. अंबड येथुन जात असतांना धुळे-सोलापुर राष्ट्रिय महामार्गावरील आडुळ बायपासवर पाठीमागुन येत अज्ञात दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांची दुचाकी अडवुन दुचाकीस्वार महिलेच्या गळ्याला चाकु लावुन त्याच्या गळ्यातील मनीमंगळसुञ चोरुन नेल्याची घटना शुक्रवारी (ता.३१) रोजी राञी नऊ वाजेच्या सुमारास घडल्याने परिसरातील वाहन धारकात भितीचे वातावरण आहे.

याविषयी अधिक माहिती अशी कि नारायण प्रभाकर बिडवे व त्यांच्या पत्नी सुनिता नारायण बिडवे दोघे राहणार रामगव्हाण (ता.अंबड) हे दोघे पती-पत्नी शुक्रवारी (ता.३१) रोजी रामगव्हाण येथुन त्यांच्या दुचाकी क्रमांक एम एच२१ पि ए ०६१० ने छञपती संभाजीनगर येथे राहणारया त्यांच्या लेकी भेटण्यासाठी जात होेते त्यांची दुचाकी महामार्गावरील रजापुर शिवारात आल्यानंतर येथील एका हॉटेल जवळुन एका अज्ञात दुचाकीवर दोन जण त्यांचा पाठलाग करीत होते.

त्यांची दुचाकी आडुळ बायपास वरील विनायक गॅस एजन्सी जवळ आल्यावर त्यांचा पाठलाग करणारी दुचाकी अचानक त्यांच्या समोर आडवी लावल्याने त्यांना दुचाकी थांबवावी लागली. त्या विनानंबर प्लेट च्या दुचाकीवरील दोघाजणांनी दुचाकीवरील महिला सुनिता बिडवे यांच्या गळ्याला चाकु लावुन त्यांच्या गळ्यातील मनीमंगळसुञ हिसकावुन घेतला व तेथुन पोबारा केला.

यानंतर सदरील दुचाकीस्वार पती-पत्नीनी त्यांचे आडुळ येथे राहात असलेले त्यांचे नातेवाईक यांना घटनेची माहिती दिली. माञ तो पर्यंत चोरटे फरार झाले होते. राञी उशारा पर्यंत या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात घेण्यात आलेली नव्हती.

मागच्या शु्क्रवारीच आडुळ येथील मारुती मंदिर येथे पुजारी असलेल्या महिलेला दक्षिणा देण्याचे आमिष दाखवुन पुजेसाठी तुमच्या गळ्यातील पोत द्या म्हणुन पोत लंपास केली होती त्याचा अद्यापपर्यंत शोध लागला नाही तोच आठवडा भरातच हि दुसरी घटना घडल्याने आडुळ परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT