Crime News esakal
सातारा

पाणीपुरीचा गाडा चालविणाऱ्या परप्रांतीयावर तलवारीने हल्ला

हल्लेखोराला वाई पोलिसांकडून अटक

भद्रेश भाटे

हल्लेखोराने मध्यवस्तीतील दारूच्या गुत्त्यावर जाऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.

वाई (सातारा) : येथील महागणपती मंदिराजवळ (Wai Mahaganapati Temple) पाणीपुरीचा गाडा चालविणाऱ्या परप्रांतातील तरुणावर एकाने तलवारीने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. भरदुपारी बारा वाजता हा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, दोन्ही हातात तलवारी घेऊन दहशत माजवत शहराच्या मध्यवस्तीतील मद्याची दुकाने बंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या हल्लेखोराला वाई पोलिसांनी (Wai Police) त्वरित अटक केली. अजय गोपी घाडगे (वय २३, रा. लाखानगर, वाई) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रिकू मुन्नीलाल ठाकूर (वय ३८, रा. साक्षीविहार, सह्याद्रीनगर-वाई, ता. वाई, जि. सातारा, मूळ रा. ग्वाल्‍हेर ता. जि. ग्वाल्‍हेर, मध्यप्रदेश) असे जखमीचे नाव आहे. त्याचा महागणपती मंदिराजवळ पाणीपुरीचा गाडा आहे. त्याने सकाळी नेहमीप्रमाणे दहा वाजता व्यवसाय सुरू केला. काही वेळाने नैसर्गिक विधीसाठी जाताना समोरून दोन्ही हातात तलवारी घेऊन एक जण आला. तो म्हणाला, पाणीपुरीवाला भैय्या तू कुठला आहेस. मी मध्यप्रदेशमधील असून, चार वर्षांपासून प्रामाणिकपणे पोटासाठी व्यवसाय करीत आहे. माझा कोणाला त्रास नाही, असे सांगितले. त्यावर त्याने तुम्ही भैय्ये महाराष्ट्रात येऊन राज्य करणार काय, थांब तुला दाखवतो, तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून त्याने त्याच्या हातातील तलवारीने डोक्यात वार केला. त्यावेळी खाली वाकून बचावासाठी दोन्ही हात डोक्यावर धरून तलवारीचा वार अडविला असता उजव्या हाताचे मधले बोट तुटून खाली पडले तसेच इतर तिन्‍ही बोटांना व डाव्या हाताच्या तळव्यावर गंभीर दुखापत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, त्यापूर्वी हल्लेखोराने मध्यवस्तीतील दारूच्या गुत्त्यावर जाऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. दुकान चालकांना दमदाटी केली. दुकाने बंद करण्यास भाग पाडले. यानंतर किसन वीर चौक चौकात असणाऱ्या वाईन शॉपमध्ये घुसून येथील फर्निचरची व काचांची मोडतोड केली. दुकानात दहशत माजवत ग्राहकांना बाहेर काढले व दुकान बंद करण्यासाठी धमकी दिली, अशी तक्रार सहा दुकानदारांनी पोलिसात दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक कृष्णकांत पवार, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे व पोलिस कर्मचाऱ्यांनी जाऊन शहरात दहशत माजविणाऱ्या हल्लेखोराला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर सायंकाळी पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या दालनात व्यापाऱ्यांची बैठक सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT