सातारा

उरमोडी धरणानजीकच्या 'त्या' प्रसिद्ध हाॅटेल चालकावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

सातारा : पुनवडी (ता. सातारा) येथे उरमोडी धरणाच्या कडेला असलेले हॉटेल तेजस रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्याप्रकरणी तिघांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपत राघू देवरे, उमेश संपत देवरे व गणेश संपत देवरे (सर्व रा. पुनवडी, ता. सातारा) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत हवालदार दीपक पोळ यांनी फिर्याद दिली आहे. हवालदार बर्गे तपास करत आहेत. 

दरम्यान चिखली (ता. सातारा) व डफळवाडी (ता. पाटण) येथील पवनचक्की कंपन्यांच्या तारांची चोरी करणाऱ्या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख 51 हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा जप्त करण्यात आल्या आहेत. 
अरविंद शंकर शिर्के (वय 35), सुखदेव बाळू शिर्के (वय 39), लक्ष्मण पांडुरंग शिर्के (वय 36) व रामचंद्र लक्ष्मण शिर्के (वय 30, सर्व रा. चिखली, ता. सातारा) अशी त्यांची नावे आहेत. पवनचक्की कंपन्यांच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा छडा लावण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सर्जेराव पाटील यांना दिले होते. त्यानुसार त्यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांच्या नेतृत्वाखाली पथकाची स्थापना केली होती.
 
तारा चोरणाऱ्या टोळीतील बुधवार नाका परिसरात येणार असल्याची माहिती पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला या परिसरात सापळा रचण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार या पथकाने दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांना ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्यांनी चिखली व डफळवाडी येथून तारा चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एक लाख 51 हजार रुपयांचा तांब्याच्या तारा जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील तपासासाठी त्यांना तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कारवाईमध्ये पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, सहायक फौजदार उत्तम दबडे, हवालदार तानाजी माने, रामा गुरव, संतोष पवार, विजय कांबळे, रवी वाघमारे, अर्जुन शिरतोडे, अजित कर्णे, संजय जाधव यांनी सहभाग घेतला. 

जुगार अड्ड्यावर छापा

सातारा : शहर पोलिसांनी तीन, तर तालुका पोलिसांनी एका ठिकाणच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तालुका पोलिसांनी शेंद्रे येथे छापा टाकला. या प्रकरणी रमेश दिनकर जावलेकर (वय 46, रा. कामाठीपुरा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा 742 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी मुख्य बस स्थानक परिसर, क्षेत्र माहुली, कामाठीपुरा या ठिकाणी छापे टाकले. या प्रकरणी अनुक्रमे मुनिबराज कुमार शर्मा (वय 36, रा. करंजे पेठ), शंकर भीमराव धोतरे (वय 38, रा. शेंद्रे, ता. सातारा), समीर कच्छी (रा. मोळाचा ओढा), गोपाळ शंकर जाधव (वय 66, रा. गोडोली) तसेच समीर कच्छी (रा. मोळाचा ओढा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा सुमारे 13 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. 


निगडीतील दारूअड्ड्यावर छापा 

सातारा : निगडी वंदन (ता. सातारा) येथील विनापरवाना दारूविक्रीच्या अड्ड्यावर तालुका पोलिसांनी छापा टाकला आहे. याप्रकरणी प्रल्हाद शंकर चिखले (वय 56, रा. निगडी वंदन, ता. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून देशी व विदेशी दारूच्या 52 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. 

कोरोना मृत्यूदर रोखण्यासाठीचा साताऱ्याचा हा प्लॅन ठरू शकतो राज्यासाठी आयडॉल

सातारा जिल्ह्यातील जावळी,पाटण तालुक्यातील बाधितांचा मृत्यू; नव्याने 46 कोरोनाबाधित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dream11 ची माघार, मग टीम इंडियाचा स्पॉन्सर कोण? Toyota सह तगडी कंपनी शर्यतीत; आशिया चषकापूर्वी BCCI ला लागणार लॉटरी?

Latest Marathi News Updates: गोरक्षका विरुद्ध कारवाई करण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दाखल

गोविंदाच्या पत्नी सुनिताच होतं दुसऱ्या अभिनेत्यावर क्रश, कबुली देत म्हणाली...'गोविंदा त्याच्यासारखा दिसायचा म्हणून...'

Adventure ट्रेकिंगसाठी शोधताय खास ठिकाण? अरुणाचल प्रदेशातील 'या' आयो व्हॅली ट्रेकचा अनुभव घ्या!

Hartalika Vrat 2025 Puja Samagri: अखंड सौभाग्यासाठी हरतालिका व्रत; पूजेसाठी लागणारे साहित्य व विधीची संपूर्ण माहिती वाचा एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT