crime sakal
सातारा

विवाहितेच्‍या खूनप्रकरणी खेडमधील चौघांवर गुन्‍हा

उपचारादरम्‍यान झाला होता मृत्‍यू, मारहाणीची तक्रार

सकाळ वृत्तसेवा

सातारा : गंभीर स्‍वरूपाची मारहाण केल्‍याने विवाहितेचा मृत्‍यू झाल्‍याच्‍या फिर्यादीनुसार काल रात्री सातारा शहर पोलिस ठाण्‍यात खेड येथील गोवर्धनगर येथील चौघांवर खुनाचा गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. याची फिर्याद अतुल दत्तात्रय धुमाळ (रा. पुणे) यांनी नोंदवली. खेड येथील गोवर्धननगरमध्‍ये सुजाता शंकर भोळे (वय २४) या राहण्‍यास होत्या. २०१८ मध्‍ये त्‍यांचा विवाह झाला होता.

मुलगी झाल्‍याच्‍या कारणावरून त्‍यांचा शंकर भोळे व इतरांनी छळ चालू केला. लॅब सुरू करण्‍यासाठी, तसेच इतर कारणासाठी माहेरहून ५ लाख आणावेत, यासाठी नंतर त्‍यांनी सुजाता यांना मारहाण करणे सुरू केले. ता. २० रोजी सकाळी शंकर भोळे यांनी सुजाता यांना उपचारासाठी जिल्‍हा रुग्‍णालयात दाखल केल्‍याचे अतुल धुमाळ यांना फोनद्वारे सांगितले. यानंतर ते साताऱ्याकडे येण्‍यास निघाले. याचदरम्‍यान उपचारादरम्‍यान सुजाता यांचा मृत्‍यू झाला. या वेळी त्‍यांच्‍या शरीरावर मारहाणीच्‍या खुणा होत्‍या. यानंतर सुजाता यांचे शवविच्‍छेदन पुणे येथे करण्‍यात आले. मारहाणीमुळेच सुजाता यांचा मृत्‍यू झाल्‍याचा आरोप करत याबाबतची फिर्याद अतुल धुमाळ यांनी सातारा शहर पोलिस ठाण्‍यात नोंदवली. यानुसार शंकर काळूराम भोळे, लीलाबाई काळूराम भोळे, राजेंद्र काळुराम भोळे, स्‍वाती राजेंद्र भोळे (सर्व रा. खेड) यांच्‍यावर खुनाचा गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. याचा तपास पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT