सातारा

म्हसवडमध्ये शेळ्यामेंढ्यांच्या बाजारात तुफान गर्दी

सल्लाउद्दीन चोपदार

म्हसवड (जि. सातारा) : कोरोना संकटामुळे सात महिन्यांनंतर बुधवारी येथील शेळ्यामेंढ्यांच्या आठवडा बाजार सुरू झाल्यामुळे शेतकरी व खरेदीदारांची मोठी गर्दी झाली. जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांतील व्यापाऱ्यांची गर्दी झाली होती. 

बुधवारी सकाळपासून बाजारात गावोगावचे शेतकरी व मेंढपाळ शेळ्या-मेंढ्या विक्रीसाठी घेऊन आल्यामुळे बाजारात जनावरांची आवक मोठ्या संख्येने झाली. शेळ्या, मेंढ्या, बोकड खरेदीसाठी कोकणपट्टीसह कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांमधील खरेदीदारांची मोठी उपस्थिती होती. विशेषतः माण तालुक्‍यामधील शेळ्या, बोकड, मेंढ्या व बकऱ्यांच्या मटणास चव वेगळी असते. त्यामुळे गावोगावच्या व विशेषत: शहरी भागातील ग्राहकांची मोठी पसंतीही असते. कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर इत्यादी जिल्ह्यांमधील मटण विक्रेते आज बोकड, शेळ्या खरेदीसाठी बाजारात आले होते. कोरोनामुळे येथील जनावरांचा आठवडा बाजारच बंद राहिल्यामुळे मेष व शेळी पालन व्यवसायातील शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील आर्थिक नाडीच बंद पडली होती. विजयादशमी व दीपावली सणापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाउनमध्ये शिथिलता आणून शेळ्या, मेंढ्यासह जनावरांचा बाजार सुरू करण्यास परवानगी दिल्यामुळे शेतकरी बांधवास दिलासा मिळाला आहे. 

जनावरांचा आठवडी बाजार सुरू झाल्यामुळे स्थानिक पातळीवर बाजारात बोकडांची खरेदी करणे सोयीचे झाले. लॉकडाउनमुळे सुमारे 36 आठवडे बाजार भरले नाहीत. बोकड खेड्यापाड्यातून शोधून आणावे लागत होते. 
-नूरमहंमद मुजावर, मटण विक्रेते, म्हसवड 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: लोकल ट्रेनमधील मृत्यू रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय, प्रवाशांना मोठा दिलासा

Crime: धक्कादायक! आपच्या बड्या नेत्यावर बेछूट गोळीबार; माजी डीएसपींनी घडवलं कृत्य, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : बच्चू कडूंनी जिल्हाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

Badamrao Pandit : भाजप प्रवेश होताच माजी आमदार आक्रमक! विजयसिंह पंडित हे अचानक अन् पैशाने झालेले आमदार

Women's World Cup 2025: २० चौकार,४ षटकार... सेमीफायनलमध्ये द. आफ्रिकेच्या कर्णधाराचं वादळी शतक; विश्वविक्रमही केला नावावर

SCROLL FOR NEXT