Dadasaheb Dhayagude esakal
सातारा

जिद्दीला सलाम! ..अखेर 108 वर्षांच्या आजोबांनी कोरोनाला हरवलंच

अशपाक पटेल

खंडाळा (सातारा) : अहिरे (ता. खंडाळा) येथील वय वर्ष 108 असलेल्या आजोबा दादासाहेब बापुराव धायगुडे (Dadasaheb Dhayagude) यांनी वृध्दापकाळात ही जिद्दीच्या जोरावर कोरोना आजारावर मात केली आहे. 108 वर्षीय दादासाहेब धायगुडे यांना 16 व 17 मे रोजी ताप, अंगदुखी व आवाजात बदल ही प्राथमिक लक्षणे दिसताच अहिरे प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Center) कोरोनाची टेस्ट (Corona Test) केली व रिपोर्ट येताच त्यांना, लोणंद येथील स्वामी समर्थ क्रिटीकेअर येथे 18 मे रोजी दाखल केले. (Dadasaheb Dhayagude Of Ahire Village Defeated Coronavirus)

अहिरेतील वय वर्ष 108 असलेल्या दादासाहेब धायगुडे यांनी वृध्दापकाळात ही जिद्दीच्या जोरावर कोरोना आजारावर मात केली आहे.

अॉक्सिजनचे प्रमाण 90-92% राहत असल्याने अॉक्सिजन व औषधपचार चालू झाले. आजाराच्या वेळापत्रकानुसार 20 मे रोजी सी. टी. स्कॅन केला असता रिपोर्ट चुकीचा आला. या आजोबांचे नातू डॉक्टर उत्कर्ष धायगुडे यांनी डॉ. मकरंद डोंबाळे व डॉ. उमेश साळुंखे यांनी आश्वस्त केले. रुग्णालयात दाखल केल्यावर ताप व अंगदुखी कमी झाली. जेवण दिवसेंदिवस वाढले. नातू डॉ. धायगुडे, पत्नी वैद्य सौ. लता व मित्र निरंजन निगडे यांनी आयुर्वेदिक काढे व चवनप्राश हे डॉक्टर (Doctor) यांच्या सल्ल्याने चालू केले. वयोमानामुळे त्यांना सर्व सांधेदुखी झाली, पण हॉस्पिटल नियमानुसार स्टाफने त्यांच्याकडून श्वसनाचे व्यायाम, उजव्या व डाव्या कुशीवर व प्रोन स्लिप हे प्रकार त्यांच्या कलाने करवून घेतले.

व्हिल चेअरवर 02 लावून बसवणे, भजनाचा सराव करणे, वेळप्रसंगी आजोबांना न जेवण्याचा हट्ट केलाच तर प्रेमाने भरवण्याची कामे सर्व स्टाफ व ड्युटी डॉक्टरांनी प्रेमाने केली. डॉक्टरांनी वेळीच केलेले योग्य औषधपचार, स्टाफने दिलेली प्रेमळ वागणूक, नातेवाईकांनी केलेली मदत यामुळे दादासाहेब धायगुडे यांनी वयाच्या 108 व्या वर्षी कोरोनावर मात केली आहे. यासाठी स्वामी समर्थ परिवारचा सर्व स्टाफ, डॉ. विजय, डॉ. पद्मिनी, डॉ. प्रियंका, तसेच संदीप, शुभम, माधुरी, अश्विनी, करण, समीर धायगुडे, रणजित शेळके व डॉ. उत्कर्ष धायगुडे यांचे प्रयत्न यशस्वी ठरले.

Dadasaheb Dhayagude Of Ahire Village Defeated Coronavirus

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT