Dahiwadi Nagar Panchayat Election
Dahiwadi Nagar Panchayat Election esakal
सातारा

Dahiwadi : नगराध्यक्ष पदासाठी NCP, BJP, शिवसेनेत मोठी चुरस

रुपेश कदम

चुरशीने लढल्या गेलेल्या नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने आठ जागा मिळवत सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला.

दहिवडी (सातारा) : नगरपंचायतीचा (Dahiwadi Nagar Panchayat Election) नगराध्यक्ष कोण होणार, हे माण-खटावचे राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख (NCP leader Prabhakar Deshmukh) ठरवणार असून, चमत्कारावर अवलंबून असलेले भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party), शिवसेनासुध्दा (Shiv Sena) नशीब अजमावण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज (ता. चार) कोण अर्ज भरणार? नऊ जानेवारी रोजी हे अर्ज राहणार का? अन्‌ दहा जानेवारी रोजी बिनविरोध की मतदानाने नगराध्यक्ष निवडला जाणार, याबद्दल चर्चा रंगू लागली आहे.

अतिशय चुरशीने लढल्या गेलेल्या नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने (NCP) आठ जागा मिळवत सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. भाजपला पाच जागांवर समाधान मानावे लागले तर शिवसेनेला तीन जागा मिळाल्या. एक अपक्ष नगरसेवक निवडून आला. निकालानंतर अपक्ष नगरसेवक राष्ट्रवादीच्या गुलालात रंगला व त्याने राष्ट्रवादीशी संधान बांधले. यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. सध्या राष्ट्रवादी नऊ, भाजप पाच व शिवसेना तीन असेल बलाबल आहे.

नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण पडल्याने अनेकांच्या आशा-आकांक्षांना धुमारे फुटले. राष्ट्रवादी अंतर्गत मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरू झाले. सर्वसाधारण महिला आरक्षण पडले असते तर नीलिमा पोळ व वर्षाराणी सावंत यांच्यात रस्सीखेच झाली असती. परंतु, महिला आरक्षण नसल्यामुळे पुरुषालाच संधी द्यावी, असा एक मतप्रवाह पक्षांतर्गत जोर धरू लागला आहे. त्यानुसार सध्या सागर पोळ, महेश जाधव व सुरेंद्र मोरे यांच्या समर्थकांनी सुरुवातीला नगराध्यक्षपद आपल्यालाच मिळावे म्हणून जोर लावला आहे.

हे तीनही उमेदवार तरुण, तडफदार व तरुण कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा असलेले आहेत. त्यामुळे कोणाला संधी मिळणार, याबद्दल आडाखे बांधले जाऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना विरोधकांकडून मोठी आमिषे दाखवण्यात येत असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफुसीचा फायदा भाजपचे धनाजी जाधव व शिवसेनेच्या सुरेखा पखाले घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व शक्याशक्यता पाहता नगराध्यक्षपदासाठी कोण मैदानात उतरणार, यासाठी उद्या सायंकाळी पाचपर्यंत वाट पाहावी लागेल.

नगराध्यक्षपदाचा तिढा प्रभाकर देशमुख सोडवणार

नगराध्यक्षपदाच्या मुद्यावर रामबाण उपाय प्रभाकर देशमुख काढतील, अशी खात्री निष्ठावंतांना आहे. कारण ज्या पद्धतीने प्रभाकर देशमुख यांनी नगरपंचायत निवडणुकीत रणनीती आखली आणि त्यानंतरही त्यांनी अपक्ष नगरसेवकाला सोबत घेण्यासाठी जे डावपेच रचले, ते पाहता नगराध्यक्षपदाचा तिढासुध्दा ते लीलया सोडवून माण राष्ट्रवादीत माझाच शब्द अंतिम असेल, असा संदेश देतील याचा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT