Dahiwadi Nagar Panchayat Election
Dahiwadi Nagar Panchayat Election esakal
सातारा

अर्ज भरण्यास 5 मिनिटं उरली असताना घडली नाट्यमय घडामोड अन्..

रुपेश कदम

सर्वसाधारण आरक्षण पडल्यानंतर राष्ट्रवादी अंतर्गत नगराध्यक्ष पदासाठी चढाओढ सुरु झाली होती; पण..

दहिवडी (सातारा) : संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलेल्या दहिवडी नगरपंचायत निवडणुकीत (Dahiwadi Nagar Panchayat Election) पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी घडल्या असून राष्ट्रवादीतील असंतोष उफाळून आलाय. राष्ट्रवादीचे (NCP) नगरसेवक महेश जाधव यांनी भाजपच्या (BJP) नगरसेवकांच्या मदतीने नगराध्यक्ष (Mayor Post Election) पदासाठी अर्ज दाखल करुन बंडाचं निशाण फडकवलंय.

नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण आरक्षण पडल्यानंतर राष्ट्रवादी अंतर्गत नगराध्यक्ष पदासाठी चढाओढ सुरु झाली होती. नगरसेवक महेश जाधव व सागर पोळ यांच्या समर्थकांनी आपलाच नेता नगराध्यक्ष होणार म्हणून समाजमाध्यमातून जोरदार प्रसिद्धी चालवली होती. यासोबतच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत हे आपल्या पत्नीसाठी आग्रही होते. तर सुरेंद्र मोरे यांना नगराध्यक्ष पद मिळावे, असाही एक मतप्रवाह होता. मात्र, प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) यांनी आपले मत सागर पोळ यांच्या पारड्यात टाकून सागर पोळ यांना राष्ट्रवादीचे उमेदवार (NCP candidate) म्हणून जाहीर केलं.

आज नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी दुपारी १२:४३ वाजता भाजपचे धनाजी जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जावर नीलम जाधव यांनी सूचक म्हणून, तर रुपेश मोरे अनुमोदक म्हणून सही केली. दुपारी १२:४५ वाजता शिवसेनेच्या (Shiv Sena) सुरेखा पखाले यांनी आपला अर्ज भरला. त्यांना शैलेंद्र खरात हे सूचक तर विजया जाधव अनुमोदक आहेत. दुपारी ठिक १:२५ वाजता सागर पोळ यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल केली. त्यांना निलिमा पोळ ह्या सूचक तर विशाल पोळ हे अनुमोदक आहेत.

मात्र, अर्ज भरण्यास फक्त पाच मिनिटे उरली असताना नाट्यमय घडामोड घडली. भाजपचे धनाजी जाधव हे भाजपच्या राणी अवघडे यांना घेवून नगरपंचायतमध्ये आले. अनेकांचा असा समज झाला की राणी अवघडेंचा पण अर्ज भरणार आहेत. परंतु, येथे धनाजी जाधव यांनी राष्ट्रवादीला सुरुंग लावल्याचे स्पष्ट झाले. बरोबर १:५५ वाजता महेश जाधव यांचा उमेदवारी अर्ज सूचक असलेल्या राणी अवघडे यांनी भरला, तर भाजपच्या उज्वला पवार या अनुमोदक आहेत. ही माहिती बाहेर येताच राष्ट्रवादीच्या गोटात शांतता पसरली. तत्काळ महेश जाधव यांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. मात्र, महेश जाधव यांचा मोबाईल बंद असल्यामुळे ते कुठे आहेत हे समजू शकले नाही. नऊ फेब्रुवारी ही अर्ज माघारी घेण्याची तारीख असून दहा फेब्रुवारीला नगराध्यक्षाची निवड होणार आहे. आज झालेल्या घडामोडीमुळे राजकीय वातावरण तापले असून नऊ व दहा तारखेला काय होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT