Shivendrasinharaje Bhosle esakal
सातारा

'ठरलं होतं, तसंच झालं'; आमदार शिवेंद्रसिंहराजेंचं अध्यक्षपद हुकलं, पण..

उमेश बांबरे

'अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या दोन्ही निवडी आपल्याला एकमतानं करायच्या आहेत, असं ठरलं होतं आणि तसंच झालं.'

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (Satara District Bank Election) नूतन अध्यक्ष नितीन पाटील (Nitin Patil) व उपाध्यक्ष अनिल देसाई (Anil Desai) जिल्हा बँक अतिशय चांगल्याप्रकारे चालवण्याबरोबरच जिल्हा बँकेचा नावलौकिक कायम राखतील, असा विश्वास माजी अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांनी व्यक्त केला. सातारा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा जिल्हा बँक अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) तसेच अन्य संचालक मंडळी आम्ही एकत्र बसलो होतो. त्यावेळी सर्वांशी चर्चा झाली. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या दोन्ही निवडी आपल्याला एकमताने करायच्या आहेत, असं यावेळी ठरलं होतं आणि तसंच झालं. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडी बिनविरोध करण्याची सातारा जिल्हा बँकेची परंपरा आहे. यावेळीही ती कायम राहिली. त्यानुसार अध्यक्षपदासाठी नितीन पाटील आणि उपाध्यक्षपदासाठी अनिल देसाई यांचे नाव निश्चित केलं. नूतन अध्यक्ष पाटील आणि उपाध्यक्ष देसाई हे दोघेही जिल्हा बँकेचा नावलौकिक कायमच ठेवतील, असा विश्वासही शिवेंद्रसिंहराजेंनी व्यक्त केला.

नवीन पदाधिकारी सभापती रामराजे, बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँक अतिशय चांगली चालवतील, असा मला विश्वास आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा संधी मिळावी म्हणून मी स्वत: इच्छुक होतो. माझ्याबरोबरच सत्यजितसिंह पाटणकर, राजेंद्र राजपूरे इच्छुक होते. उपाध्यक्षपदासाठी दत्तानाना ढमाळ आणि शिवरुपराजे खर्डेकर यांनीही इच्छा व्यक्त केली होती. प्रत्येकांनी इच्छा व्यक्त केली होती. इच्छुकांनी आपली मते मांडली होती. मात्र, दोन्ही निवडी एकमताने करण्याचे ठरले होते. त्यानुसार या निवडी झाल्या आहेत. दरम्यान, उदयनराजे (Udayanraje Bhosle) अध्यक्षपदासाठी इच्छुक होते, असे त्यांना छेडले असता त्यांनी त्यावर अधिक प्रतिक्रिया दिली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT