Dhebewadi Businessman esakal
सातारा

Satara Crime : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यावसायिकाचा मराठवाडी धरणात आढळला मृतदेह; घात की अपघात? पोलिसांचा बळावला संशय

मराठवाडी धरणाच्या जलाशयाच्या परिसरात रस्त्याकडेला त्यांची दुचाकी आढळून आली.

सकाळ डिजिटल टीम

कोळेकर यांचा सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यातून हिरिरीने सहभाग असायचा. ते उमरकांचन विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष व संचालक होते.

ढेबेवाडी : येथील एका व्यावसायिकाचा मृतदेह काल (मंगळवार) सकाळी मराठवाडी धरणाच्या (Marathwadi Dam) जलाशयात आढळून आला. शिवाजी लक्ष्मण कोळेकर (वय ५०, मूळगाव कोळेकरवाडी, सध्या रा. ढेबेवाडी, ता. पाटण) असे नाव असून, दोन दिवसांपासून ते बेपत्ता होते.

याबाबतची माहिती अशी, कोळेकर कुटुंबीय अनेक वर्षांपासून येथे स्थायिक असून, येथे त्यांचे हार्डवेअर दुकान आहे. शिवाजी कोळेकर हे रविवारी (ता. पाच) दुपारी घरातून निघून गेले होते. मात्र, उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीय व नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतल्यावर मेंढ (ता. पाटण) गावाजवळ मराठवाडी धरणाच्या जलाशयाच्या परिसरात रस्त्याकडेला त्यांची दुचाकी आढळून आली.

नातेवाइकांनी येथील पोलिस ठाण्यात (Dhebewadi Police) ते बेपत्ता झाल्याची खबर दिली होती. दोन दिवसांपासून जलाशय व परिसरात त्यांचा शोध सुरू होता. काल सकाळी जलाशयात मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. शिवाजी कोळेकर यांचाच मृतदेह असल्याचे नातेवाइकांनी ओळखले. कऱ्हाड येथे उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोळेकर यांचा सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यातून हिरिरीने सहभाग असायचा. ते उमरकांचन विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष व संचालक होते. माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मणराव कोळेकर यांचे ते सुपुत्र, तर पाटण शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती दिलीपराव कोळेकर यांचे बंधू होत. त्यांच्या मागे वडील, पत्नी, दोन मुलगे, मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT