murder case sakal
सातारा

शिद्रुकवाडीच्या बेपत्ता युवकाचा ढेबेवाडीजवळ आढळला मृतदेह

दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिद्रुकवाडी (गुढे,ता.पाटण) येथील युवकाचा मृतदेह आज सकाळी येथील वांगनदीवरील पुलानजीक नदीपात्रात आढळून आला.

राजेश पाटील

दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिद्रुकवाडी (गुढे,ता.पाटण) येथील युवकाचा मृतदेह आज सकाळी येथील वांगनदीवरील पुलानजीक नदीपात्रात आढळून आला.

ढेबेवाडी - दहा दिवसांपासून बेपत्ता (Missing) असलेल्या शिद्रुकवाडी (गुढे,ता.पाटण) येथील युवकाचा मृतदेह (Youth Deathbody) आज सकाळी येथील वांगनदीवरील पुलानजीक नदीपात्रात आढळून (Found) आला. नथुराम मोहन पाटील (वय ३४) असे मृताचे नाव असून त्यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

याबाबत पोलिसांची माहिती अशी, शिद्रुकवाडी (गुढे) येथील नथुराम पाटील मुंबईस कामाला होते. मात्र, अलीकडे काही दिवसांपासून ते गावीच राहात होते. दहा दिवसांपूर्वी कुणाला काही न सांगता ते घरातून निघून गेले. कुटुंबीय, नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांचा विविध ठिकाणी शोध घेऊनही न सापडल्याने ते बेपत्ता झाल्याची तक्रार अखेर येथील पोलीस ठाण्यात देण्यात आली.आज सकाळी कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावरील येथील वांग नदीपात्रातील नव्या पुलानजीकच असलेल्या जुन्या कमी उंचीच्या व वापरात नसलेल्या पुलाजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना नागरिकांना आढळून आला. याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.

मृतदेह पाण्याबाहेर काढून ओळख पटविल्यावर तो नथुराम पाटील यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी शिद्रुकवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. नथुराम अविवाहित होते. काही दिवसांपासून त्यांचे मानसिक स्वास्थ्य ठीक नव्हते. त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या मागे आई,भाऊ,बहीण असा परिवार आहे.सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एस.बी राक्षे तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Athawale : ‘उत्तम, नुसती नावे सांगू नकोस' मंत्री रामदास आठवलेंनी कोल्हापूरच्या जिल्ह्यातील नेत्यांची केली खरडपट्टी

असं काय घडलं की, नाटक सुरु असताना स्वप्नील जोशीचं मध्येच थांबवलं, म्हणाला...'सॉरी पण...'

CJI Suryakant: ‘तारीख पे तारीख’ युग संपलं? सुप्रीम कोर्टाची हायकोर्टांसाठी नवी डेडलाइन, न्यायासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागणार नाही

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, थांबलेल्या ट्रकला कारची धडक; माय-लेकीचा मृत्यू, बाप-लेक गंभीर जखमी

Gokul Dudh Sangh Politics : मुश्रीफांना घेऊनच महायुतीचे पॅनेल, आमदार शिवाजी पाटील यांचा पत्ता कट?; गोकुळच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT