Bhuiyanj esakal
सातारा

मुलाला तणनाशक पाजून विवाहितेची आत्महत्या

विलास साळुंखे

भुईंज (सातारा) : सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून वरचे चाहूर (ता. वाई) येथे विवाहितेने तीन वर्षांच्या बालकाला विषारी तणनाशक पाजून स्वत:ही तणनाशक प्राशन केले. सातारा येथे उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्यू झाला, तर बालकावर रुग्णालयातील (Hospital) अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पूजा सुदाम भोरे (वय २७) असे मृताचे नाव आहे, तर राजवीर सुदाम भोरे असे बालकाचे नाव आहे.

वरचे चाहूर (भुईंज) येथील पूजा भोरे यांना सासू, सासरे, पती, नणंद यांच्याकडून जाचहाट केला जात होता.

याबाबत भुईंज पोलिसांनी (Bhuinj Police) दिलेल्या माहितीनुसार, वरचे चाहूर (भुईंज) येथील पूजा भोरे यांना सासू, सासरे, पती, नणंद यांच्याकडून जाचहाट केला जात होता. या त्रासाला कंटाळून पूजा यांनी मंगळवारी (ता. १४) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी स्वतः विषारी औषध प्राशन करून राजबीरलाही विषारी औषध पाजले. ही घटना लक्षात येताच दोघांनाही सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात (Krantisinha Nana Patil Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पूजा यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. राजबीर याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, याप्रकरणी पूजा यांचे पती सुदाम भगवान भोरे, सासरे भगवान बाबूराव भोरे, सासू हिराबाई भोरे (रा. वरचे चाहूर, भुईंज), नणंद माधुरी किसन देडे (रा. काकरंबा, तुळजापूर, ता. उस्मानाबाद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रात्री उशिरा भुईंज येथील स्मशानभूमीत पूजा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनास्थळी वाईच्या पोलिस उपअधीक्षक शीतल जानवे- खराडे, भुईंजचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. या घटनेची रात्री उशिरा भुईंज पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT