Satara 
सातारा

दुर्गम, ग्रामीण भागात दळणवळणासाठी "लालपरी'ची मागणी

सकाळ वृत्तसेवा

पाटण (जि. सातारा) ः कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे दळणवळणासाठी आवश्‍यक एसटीसह रेल्वे सेवा तीन महिने बंद आहे. शहरी भागात वाहनांची सुविधा असते. त्याप्रमाणात दुर्गम, ग्रामीण भागात वाहने नसतात. परिणामी नागरिकांची प्रचंड गैरसोय सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर एसटी महामंडळाने दुर्गम भागात एसटी बस सुरू कराव्यात, अशी मागणी होऊ लागली आहे. 

आता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर एसटी महामंडळाने आपल्या विविध आगारांच्या वतीने मोठी शहरे जोडण्यासाठी सेवा सुरू केली आहे. मात्र, दुर्गम, ग्रामीण भाग अद्याप एसटीपासून वंचित ठेवला आहे. पाटण आगाराने कऱ्हाडला सेवा सुरू केली असली, तरी तारळे, चाफळ, कोयना, मोरणा व ढेबेवाडी विभागात एसटी सेवा सुरू करावी, अशी मागणी पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. 

राज्य व केंद्र सरकारने 22 मार्च रोजी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर केला. तेव्हापासून पाटण आगाराच्या ग्रामीण भागातील जनतेचा दळण- वळणाचा मुख्य आधार असलेल्या एसटी बसच्या फेऱ्या बंद आहेत. लॉकडाउनच्या काळात जनतेला जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठांच्या गावाला येताना पायपीठ करावी लागली आहे. प्रशासनाचे नियोजन व जनतेने कोरोनाच्या आपत्तीत केलेले सहकार्य यामुळे कोरोना महामारी नियंत्रणात आली आहे. शासनानेही खबरदारीसाठी घेतलेले निर्णय शिथिल केले आहेत. एसटी बस सेवेप्रमाणे अद्याप वाहतूकही ठप्प आहे.

कोरोनात विस्कळित झालेले जनजीवन आता पूर्वपदावर येत आहे. पाटण आगाराने कऱ्हाडला जशी सेवा सुरू केली आहे, तशी कोयना, मोरगिरी, चाफळ, तारळे व ढेबेवाडी विभागातही बसफेऱ्या सुरू केल्या, तर जनतेची जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी असणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर तीन महिने त्रास सहन केलेल्या जनतेला दिलासा मिळेल. त्यामुळे जनतेची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी पाटण आगाराने बस फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी सभापती श्री. शेलार यांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकीसाठी लागणार २४ हजार कर्मचारी

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भव्य ड्रोन शो

Kannad News : हैदराबाद गँझेटीयरनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्या; मुख्यमंत्री फडणवीसांकडे निवेदन देऊन केली मागणी

SCROLL FOR NEXT