Ajit Pawar Sakal
सातारा

"सातारा जिल्ह्यात नवीन 100 बेडचे हॉस्पिटल उभारणार"

ही जागा तातडीने उपलब्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

उमेश बांबरे -सकाळ वृत्तसेवा

एक एकर जागेची आवश्यकता आहे. ही जागा तातडीने उपलब्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

सातारा: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्याला १०० बेडचे नवीन जिल्हा रुग्णालय मंजूर झालेले आहे. या रुग्णालयासाठी ३५ कोटींचा निधीही मंजूर झालेला आहे. पण, सध्या जिल्हा रुग्णालयात हे हॉस्पिटल जागेअभावी सुरू करता येत नाही. त्यासाठी एक एकर जागेची आवश्यकता आहे. ही जागा तातडीने उपलब्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री पवार गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी शासकीय विश्रामगृहात सर्व शासकीय विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच अतिवृष्टी नुकसानभरपाई, मेडिकल कॉलेज व इतर विषयांचा आढावा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना बैठकीतील माहिती दिली. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) जिल्ह्याला नवे १०० बेडचे हॉस्पिटल मंजूर झाले आहे. एकूण ३५ कोटी रुपयांचे हे हॉस्पिटल असून, त्यासाठी जागेचा प्रश्न आहे. सध्याच्या जिल्हा रुग्णालयात जागाच उपलब्ध नसल्याने तेथे हे हॉस्पिटल सुरू करता येत नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले आहे. त्यामुळे या हॉस्पिटलसाठी प्रशस्त अशा एक एकर जागेची आवश्यकता आहे. ही एक एकर जागा उपलब्ध करून देण्याबाबतची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. लवकरच ही जागा उपलब्ध होऊन या हॉस्पिटलचे काम सुरू केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचे सभागृह बांधले जात आहे. त्याच्या वाढीव बांधकामासाठी जादा निधीची आवश्यकता आहे. यापूर्वी आम्ही या कामासाठी आठ कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यावेळी २०१६ च्या डीएसआरप्रमाणे निधी दिला होता. आता यामध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता आवश्यक आहे. त्यासाठी नव्याने १५ कोटी द्यावे लागणार आहेत. या सर्व गोष्टी आम्ही लवकरच देणार आहोत.

मुलांना शाळेत पाठविण्याचे सर्वाधिकार पालकांना...

शाळा सुरू झाल्या असल्या तरी मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांची अद्यापर्यंत तरी मानसिकता झालेली नाही. तरीही पालकांनी मुलांना शाळेत पाठवावे, असे आवाहन करून मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, हा सर्वस्वी अधिकार पालकांचा आहे. १२ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्र सरकारकडून अद्याप आदेश आलेले नाहीत. त्यासाठी नवीन लस उपलब्ध होणे गरजेचे आहे. ती लस आरोग्याला योग्य, अयोग्य आहे, याचे संशोधन होईल मगच निर्णय होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: NSE IPO लिस्टिंगआधीच शेअर बाजार कोसळला! Sensex 634 अंकानी घसरला; कोणते शेअर्स तोट्यात? NSE IPOचं काय झालं?

‘फक्त टी-शर्ट घालून…’ तुकाराम मुंढेंचा सेलिब्रिटींच्या समर्थनावर सवाल, प्रीती झिंटा-मल्लिकाचा उल्लेख करत म्हणाले

Asian Games 2026: "गोल्ड मिस हो गया"; ३.८८ सेकंदाने सुवर्ण हुकले, ढसाढसा रडला सतनाम; रोशिबिना देवीचे सलग तिसरे पदक

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

India New Zealand Tour : कसोटीच्या तयारीसाठी वनडेतून विश्रांती? ; न्यूझीलंड दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे संकेत

SCROLL FOR NEXT