Shivendrasinharaje Bhosle esakal
सातारा

मुंबईच्या गुंडगिरीला 'सातारी हिसका' सोसणार नाही : शिवेंद्रराजे

महेश बारटक्के

'शशिकांत शिंदे त्यांच्या गुंडगिरीच्या दहशतीच्या राजकारणामुळे निवडणुकीत पराभूत झाले.'

कुडाळ (सातारा) : हिशोब चुकते करण्याची भाषा शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी करू नये. मी तुमचे आव्हान स्वीकारले आहे. यापुढे दोन हात करण्याची तयारी ठेवा. तुमच्या पराभवाचे खापर माझ्यावर फोडू नका. मुंबईच्या गुंडगिरीला सातारी हिसका सोसणार नाही. यापुढे तुमची दहशत, गुंडगिरी जावळी तालुका चालू देणार नाही. तुमच्या पराभवाला तुमचा जावळीतील अनावश्यक हस्तक्षेपच जबाबदार आहे, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांनी सांगितले.

सोनगाव (ता. जावळी) येथे जिल्हा बॅंकेचे नवनिर्वाचित (Satara District Bank Election) संचालक ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांच्या सत्कार सोहळ्यात शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. सातारा येथे आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्या पराभवाला शिवेंद्रसिंहराजे भोसले जबाबदार असल्याचा आरोप केला. त्याला शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जोरदार प्रतिउत्तर देत शशिकांत शिंदे यांच्यावर टीका केली. श्री. भोसले म्हणाले, ‘‘शशिकांत शिंदे केवळ बगलबछ्यांच्या आणि त्यांच्या गुंडगिरीच्या दहशतीच्या राजकारणामुळे या निवडणुकीत पराभूत झाले. रांजणे यांच्या विजयामुळे जावळीत नवी सुरुवात झाली आहे. यापुढे मी जावळी तालुक्यातील सर्व निवडणुका कोणतीही राजकीय तडजोड न करता मोठ्या ताकदीने त्यांच्याविरोधात लढणार आहे. रांजणे यांचा विजय हा जावळीतील मतदारांनी ठरवून केलेला विजय आहे.’’

पक्षवाढीसाठी पक्षाच्या चौकटीत राहून काम केले म्हणता आणि दुसरीकडे पक्षातच गटबाजी करून पाडपाडीचे धंदे करता. राजेशाही थाटाचा आमच्यावर आरोप केला गेला. मात्र, प्रत्यक्षात शिंदेसाहेब राजेशाही थाट तर तुमचा मोठा आहे. आम्ही सर्वसामान्य आहोत आणि तुम्हीच स्वतः राजेशाही थाटात राजकारण करत आहात. तुमच्या राजेशाहीचा अतिरेक झाला. यामुळेच तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले. स्वतःच्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडायचे, असले धंदे आता बंद करा. वस्तुस्थिती स्वीकारा, असेही ते म्हणाले. जावळी तालुक्यात आता आरपारची लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे या लढाईत काहीही झाले तरी आता तडजोड करणार नाही. दोन हात करण्याची तयारीही ठेवली आहे. गुंडगिरी दाखवण्याचा प्रयत्न केला तर सातारी हिसकाही तुम्हाला सहन करावा लागेल, असा इशाराही शिवेंद्रसिंहराजे यांनी शशिकांत शिंदे यांना दिला आहे.

‘‘जावळीतील दहशत मोडून काढण्यासाठीच रांजणे यांचा विजय आहे. शशिकांत शिंदे यांनी आजपर्यंत अभयसिंहराजे भोसले यांचा नावाचा वापर केवळ निवडणुकीपुरताच केला आहे.’’

-शिवेंद्रसिंहराजे भोसले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT