सातारा

वारांगणांनाे धीर साेडू नका..! प्रशासन आहे तुमच्या मदतीला

दिलीपकुमार चिंचकर

सातारा : कोरोनाच्या संकटाने समाजातील सर्व घटकांचे कंबरडे मोडून गेले. अनेकांचा रोजगार गेला. शरीरविक्रय करून जीवन जगणाऱ्या महिलांची तर पुरेपूर उपासमार झाली आणि होत आहे. दररोज व्यवसाय केल्याशिवाय त्यांच्या पोटाची खळगी भरणे शक्‍यच होत नाही. मात्र, कोरोना संसर्गाच्या भीतीने त्यांचा व्यवसाय बंद झाला आहे. या महिला आणि त्यांच्या अपत्यांची उपासमार थांबावी यासाठी आता प्रशासन सरसावले असून, जिल्ह्यातील या 154 महिलांना दरमहा सुमारे आठ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.

जिल्ह्याच्या कोविड फंडातून ही मदत जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या समन्वयातून देण्याचा निर्णय नुकताच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी घेतला आहे. याबाबतची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी दिली. कोरोना विषाणूच्या संकटामुळे सर्वच नागरिकांचे जीवन विस्कळित झालेले आहे. ज्यांचे हातावरील पोट होते अशांना उपासमारीला सामोरे जावे लागले. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने कोणी कोणाच्या जवळही जाण्यास घाबरत होते. आजही घाबरत आहेत. अशा परिस्थितीत शरीरविक्रय करणाऱ्या महिलांचा व्यवसाय चालणे शक्‍यच नव्हते. हा व्यवसाय हाच त्यांची रोजीरोटी होती. पण, मार्चपासून व्यवसायच बंद झाल्याने महिला हलाखीचे जीवन कंठत होत्या.

दाेन जीवलग मैत्रिणी खेळत हाेत्या भातुकलीचा खेळ; तेवढ्यात गांधील माशांनी केला जीवघेणा हल्ला आणि सर्व संपलं

काही सामाजिक संस्थांनी जिल्ह्यातील शरीरविक्रय करणाऱ्या महिलांना सुरवातीला जीवनावश्‍यक वस्तूंची मदत केलीही. पण, अजूनही कोरोना संपलेला नाही. मिळालेली मदत कायम पुरणारी नव्हती. कोरोनाच्या भीतीने आजही या महिलांच्या रोजीरोटीचा व्यवसाय बंदच आहे. त्यामुळेच प्रशासनाने या महिलांना आता दरमहा कोरोना संपेपर्यंत मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
जिल्ह्यात सातारा, कोरेगाव, कऱ्हाड येथे शरीरविक्रय करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. या महिलांच्या अधिकृत संघटनाही आहेत. यामधील काही महिलांची मुले शाळेतही जात आहेत. मात्र, सध्या त्यांच्या जगण्याचाच प्रश्‍न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात संघटनांमध्ये नोंदणी असणाऱ्या अशा 154 महिला आहेत. त्या प्रत्येकीला आता कोविड फंडातून दरमहा पाच हजार रुपये दिले जाणार आहेत. तसेच यापैकी 34 जणींची मुले शाळेत जात आहेत. त्यांना मदत व्हावी म्हणून त्यांना आणखी प्रत्येकी 2500 रुपये दरमहा दिले जाणार आहेत. अशी कोरोनाचे संकट संपेपर्यंत दरमहा सुमारे आठ लाख रुपयांची मदत जिल्ह्यातील शरीरविक्रय करणाऱ्या महिलांना केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

पुण्यातील सातारकरांसाठी एसटीची खूषखबर
 
दरम्यान, जिल्ह्यातील शरीरविक्रय करणाऱ्या महिलांना त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, यासाठी जिल्हा महिला व बालविकास विभागाने यापूर्वीच जातीचे दाखले, शिधापत्रिका, इतर दाखले मिळवून दिले आहेत. 

""कोरोना संकटात समाजातील सर्वच घटक भरडले गेले आहेत. शरीरविक्रय करणाऱ्या महिलांना तर याचा जास्तच त्रास झाला. त्यांचे जीवनच उन्मळून पडले. त्यांची रोजीरोटीच बंद झाली. प्रशासनाच्या मदतीमुळे त्या आता सावरू शकणार आहेत.'' 

- रोहिणी ढवळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आपला जस्सी... त्यांचा जोफ्रा! Lord's वर भारत-इंग्लंड सामन्यात दिसणार वेगाची शर्यत; BCCI vs ECB आतापासूनच भिडले

Bombay Stock Exchange Journey: वडाच्या झाडाखाली सुरूवात अन्...; भारताचा शेअर बाजार आशियाचा 'आर्थिक वाघ' कसा बनला?

Thane News: पुलावर वाहतूक कोंडी कायम, प्रवासी हैराण; वाहतूक पोलिसांचा नवा प्लॅन

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

SCROLL FOR NEXT