Dnyaneshwar Maharaj Palkhi Minister Ravindra Chavan esakal
सातारा

Ashadhi Wari : पालखी सोहळ्यात कसलीही गैरसोय नको; मंत्री चव्हाणांचे प्रशासनाला आदेश

वारकऱ्यांसाठी (Pandharpur Wari) जास्तीतजास्त सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाने भर द्यावा.

सकाळ डिजिटल टीम

जिल्ह्यातील इतर पालखी तळांच्या तुलनेमध्ये फलटणचा पालखी तळ भव्यदिव्य असून, येथे पालखी सोहळ्याच्या सर्व बाबींचे योग्यरीत्या नियोजन केले जाते.

फलटण शहर : श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी (Dnyaneshwar Maharaj Palkhi) सोहळा फलटण (Phaltan) मुक्कामी असताना सोहळ्यातील वारकरी (Warkari), दिंडीकरी तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कसलीही गैरसोय होऊ नये, याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी.

यासोबतच वारकऱ्यांसाठी (Pandharpur Wari) जास्तीतजास्त सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाने भर द्यावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी दिले. सार्वजनिक बांधकाममंत्री चव्हाण यांनी काल येथे पालखी तळाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

या वेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी संजय गायकवाड, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक-निंबाळकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

फलटणचा पालखी तळ प्रशस्त असल्याने या ठिकाणी मानाच्या सर्व दिंड्या एकाच ठिकाणी बसत असून, या ठिकाणी कोणतीही अडचण येणार नाही, याची खबरदारी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. यासोबतच नोंदणी नसलेल्या दिंड्यांचीही विशेष व्यवस्था करावी, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

जिल्ह्यातील इतर पालखी तळांच्या तुलनेमध्ये फलटणचा पालखी तळ भव्यदिव्य असून, येथे पालखी सोहळ्याच्या सर्व बाबींचे योग्यरीत्या नियोजन केले जाते. श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा समिती व प्रशासनाच्या माध्यमातून फलटण पालखी तळावर कोणतीही कमतरता भासू देणार नाही, याची ग्वाही प्रांताधिकारी डॉ. जगताप यांनी या वेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole Letter to PM Modi : नाना पटोलेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र!, निवडणुकांआधी काँग्रेसने खेळलं 'मराठी कार्ड'

Google Pay Global Credit Card : ‘गुगल पे’ने लाँच केले 'ग्लोबल क्रेडिट कार्ड' ; आता 'UPI' द्वारे होणार पेमेंट!

Marathwada ACB : मानधन काढून देण्यासाठी पैशांची मागणी; लाच स्वीकारताना दोन आशा वर्कर ताब्यात!

Insurance Bill: विमा क्षेत्रात मोठी झेप! ‘सबका बिमा सबकी रक्षा’ विधेयक मंजूर; नव्या कायद्याचे परिणाम काय?

Baramati Crime : कट रचून खून केल्याचे सिद्ध; बारामती न्यायालयाचा निकाल; आरोपींना आजन्म कारावास!

SCROLL FOR NEXT