Karad Crime esakal
सातारा

Karad Crime : कऱ्हाड तालुक्यातील डाॅक्टरानं रूग्णालयातच उचललं टोकाचं पाऊल; आंघोळ करुन दवाखान्यात आले अन्..

Doctor Hemant Relekar : ओंड येथे डाॅ. रेळेकर व त्यांच्या पत्नी डॉ. दीपा अनेक वर्षांपासून वैद्यकीय व्यवसाय करतात.

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

सदरची घटना समजताच दुपारी बाराच्या सुमारास तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आत्महत्या नेमकी कशामुळे केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही.

कऱ्हाड : ओंड (ता. कऱ्हाड) येथील डाॅक्टराने (Doctor) त्यांच्या रूग्णालयातच आत्महत्या केलीये. डाॅ. हेमंत प्रभाकर रेळेकर (वय ५०) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी दवाखान्यातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पोलिसांनी सांगितले की, तालुक्यातील ओंड येथे डाॅ. रेळेकर व त्यांच्या पत्नी डॉ. दीपा अनेक वर्षांपासून वैद्यकीय व्यवसाय करतात. ओंडोशी रस्त्यावर त्यांचे रेळेकर हाॅस्पिटल होते. पहिल्या मजल्यावर ते आई, पत्नी, मुलगा, मुलगी असे परिवारासह राहत होते.

आज सकाळी डॉ. रेळेकर आंघोळ करुन दवाखान्यात आले. परंतु, परत वर घरात बराच वेळ परतले नाहीत, म्हणून कुटुंबीयांनी दवाखान्यात पाहिले असता त्यांनी दवाखान्यातीलच एका खोलीमध्ये गळफास घेतल्याचे समोर आले. दरम्यान, सदरची घटना समजताच दुपारी बाराच्या सुमारास तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आत्महत्या नेमकी कशामुळे केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dahisar Fire: दहिसरमध्ये आगीचं रौद्ररूप, परिसरात धुराचे मोठे लोट; गॅरेजला अचानक लागलेल्या आगीचा VIDEO VIRAL

Kagal Peth Naka Highway : कागल-पेठनाका 65 किमी महामार्गाचे काम पुन्हा रखडले! 1200 कोटींचा नवा आराखडा; वाहनचालकांना आणखी अडीच वर्षे वाट पाहावी लागणार?

हर्षवर्धन राणे 'या' बॉलिवूड अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये? पुण्याजवळील पानशेतमध्ये दोघांची गुपचूप ट्रिप? एका पोस्टने वाढली चर्चा

Horrible Video: सेलिब्रेशन पडले महागात, ब्राझिलचा फुटबॉलपटू थेट पडला 'खोल' खड्ड्यात; Live सामन्यातील घटनेनंतर सर्वांची पळापळ

Marathi News Live Updates : मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी लांबणीवर जाण्याची शक्यता, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT