Doctors Protest sakal
सातारा

...तर डॉक्टर घालतील कामावर बहिष्कार

जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या काही वैद्यकीय अधिकाऱ्यांना सहा महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही.

गजानन गिरी

मसूर : जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या काही वैद्यकीय अधिकाऱ्यांना (Doctors) सहा महिन्यांपासून वेतनच (Salary) मिळालेले नाही. त्यामुळे त्यांची अवस्था बिकट झाली आहे. थकीत वेतन त्वरित अदा करून यापुढे पाच तारखेपूर्वी वेतन मिळावे. अन्यथा सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांवर बहिष्कार घातला जाईल व कामबंद आंदोलन (Strike) छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

पत्रकातील माहिती अशी, काही महिन्यांपासून कोविड १९ सारख्या महामारीच्या काळात प्रमाणापेक्षा अतिरिक्त कामकाजाचा ताण असल्याने वैद्यकीय अधिकारी अधिकच मानसिक तणावाखाली आहेत. त्यातच वेतन वेळेत होत नसल्याने ते सद्यःस्थितीत प्रचंड आर्थिक चणचण सहन करत आहेत. घराचे हप्ते, गाडीचे हप्ते, शाळा कॉलेज सुरू झालेने मुलांची फी या सर्व गोष्टींसाठी पैशाची पूर्तता होत नसल्याने हे सर्व कर्मचारी तणावाखाली आहेत.

वैद्यकीय अधिकारी यांच्या दरमहाच्या वेतनासंबंधी वरिष्ठ स्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत वेळोवेळी पाठपुरावा केला जात नाही. त्यामुळे दरमहाचे वेतन नियमित व वेळेत होत नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या कामी विशेष लक्ष घालून व आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यालयीन कार्यवाही करावी. दरमहाचे वेतन पाच तारखेपूर्वी व्हावे, यासाठी प्रयत्न करावेत. अन्यथा सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांवर बहिष्कार घातला जाईल व कामबंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने अध्यक्ष डॉ. राजेंद्र जाधव, सचिव डॉ. भगवान मोहिते यांच्या वतीने देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT