Koyna Dam esakal
सातारा

'Koyna Dam : ..तर शासनाविरोधात धरणग्रस्त हजारोंच्या संख्येनं उपोषण करणार'

सचिन शिंदे, हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : कोयना धरणाच्या (Koyna Dam) लाभक्षेत्रातील जमिनी १५ दिवसांत मिळाल्या नाहीत तर हजारो खातेदार बेमुदत उपोषणास बसणार आहोत, असा इशारा धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर (Dr. Bharat Patankar) यांनी दिला आहे. यावेळी हरिश्चंद्र दळवी, महेश शेलार, सचिन कदम, प्रकाश साळुंखे, मालोजी पाटणकर, चैतन्य दळवी, संतोष गोटल, भगवान भोसले, आनंद निवळे, राजन देशमुख उपस्थित होते. (Dr. Bharat Patankar Warns Government To agitation For Koyna Dam Issue Satara Marathi News)

शासनाने ताबडतोबीने टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात वांग धरणग्रस्तांना वाटून राहिलेली शिल्लक जमीन आणि कमी पडली तर उरलेल्या लाभक्षेत्राला जमीन उपलब्ध केली पाहिजे.

डॉ. पाटणकर म्हणाले, ‘‘कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दाखवली जाणारी जमीन विखुरलेली, सिंचनाचा लाभ न होणारी आणि आवश्यक जमिनीच्या पाच टक्केसुद्धा नसणारी आहे. त्यामुळे शासनाच्या (Maharashtra Government) वागण्याच्या विरोधात कोयना धरणग्रस्त हजारोंच्या संख्येने उपोषण करणार आहेत. धरणाचे सुमारे ४१ अब्ज घनफूट पाणी सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत लाखो एकर जमिनीला मिळत आहे. तरीही ६४ वर्षे पुनर्वसन रखडले आहे. ते पूर्ण करण्यासाठी लाभक्षेत्रातील जमीन देण्याचा विचार शासन करत नाही. कोयना, कृष्णा काठावरील उपसा सिंचन योजना, टेंभू योजना (Tembhu scheme), ताकारी योजना, म्हैसाळ योजनांचे पाणी ४१ अब्ज घनफुटांपेक्षाही जास्त आहे. त्यापैकी वांग- १.०३ अब्ज घनफूट, तारळी- १.६७ अब्ज घनफूट वगळता सर्व पाणी कोयना धरणाचे आहे. या पार्श्वभूमीवर वांग धरणाचे लाभक्षेत्र हे टेंभू योजनेत असू शकते, तर कोयना धरणाचे पाणी सर्व योजनांना असताना कोयना धरणाचे लाभक्षेत्र का असू शकत नाही, हा मुद्दा शासकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नाही.’’

टेंभू योजनेचे ८० हजार ४७२ हेक्टर एवढे लाभक्षेत्र, विजेबाबत नंदनवन करणाऱ्या कोयना धरणग्रस्तांमुळे दुष्काळी भागाचेही नंदनवन झाले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शासनाने ताबडतोबीने टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात वांग धरणग्रस्तांना वाटून राहिलेली शिल्लक जमीन आणि कमी पडली तर उरलेल्या लाभक्षेत्राला जमीन उपलब्ध केली पाहिजे. आता माळरानावरची, कसण्यास न येणारी, सिंचनाची सुविधा नसणारी आणि विखुरलेली जमीन उपलब्धतेमध्ये दाखवण्यात येते आहे. त्या जिल्ह्यातील आणि सातारा जिल्ह्यातील नव्या धरणांच्या धरणग्रस्तांना वाटून शिल्लक राहणारी ही जमीन संचयाचा भाग असल्यामुळे तीसुद्धा कोयना धरणग्रस्तांना वाटपास उपलब्ध करणे आवश्यक आहे. अशी शेकडो एकर जमीन उपलब्ध आहे. जमीन असूनही उपलब्ध नसल्याचे चित्र उभे केले जात आहे. त्यात तातडीने बदल झाला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

Dr. Bharat Patankar Warns Government To agitation For Koyna Dam Issue Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT