सातारा

डॉ. विकास पाटलांच्या वायुशोधक यंत्रास पेटंट; भारत सरकारकडून 53 लाखांचे अनुदान

जगन्नाथ माळी

उंडाळे (जि. सातारा) : येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुल आणि आयक्‍यूएसी विभागाचे संचालक प्रा. डॉ. विकास पाटील यांच्या नायट्रोजन डाय ऑक्‍साईड वायूशोधक यंत्रास भारत सरकारच्या पेटंट प्रबंधक कार्यालयाकडून पेटंट प्राप्त झाले आहे. 

प्रा. डॉ. पाटील यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन केलेले आहे. वातावरणातील सर्वांत घातक व विषारी नायट्रोजन डाय ऑक्‍साईड जो वाहन व कारखान्यांच्या धुरातून वातावरणात पसरून प्रदूषण निर्माण होतो. त्यामुळे मानवी आरोग्याला धोका पोचतो. या विषयावर प्रा. डॉ. पाटील यांनी संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनात वातावरणात नायट्रोजन डाय ऑक्‍साईडचे प्रमाण किती आहे, हे ही समजते. डॉ. पाटील यांचे अमोनिया गॅस सेन्सरसंदर्भातील पेटंट पूर्वीच प्रसिद्ध झाले आहे. वरील संशोधनाकरिता भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई मधील संशोधकांचे सहकार्य मिळाले आहे. 

गॅस सेन्सॉरसंदर्भातील संशोधनाकरिता बोर्ड ऑफ रिसर्च इन न्यूक्‍लिअर सायन्स, भारत सरकारकडून आतापर्यंत त्यांना 53 लाखांचे अनुदान मिळाले आहे. त्याचबरोबर सदर संशोधनाचे इंडस्ट्रीबरोबरचे technology transfer चे काम अंतिम टप्यात आहे. प्रा. पाटील म्हणाले, ""याबाबतचे संशोधन मी तीन वर्षांपूर्वी सुरू केलेले होते. पेटटंसाठी, अर्ज केल्यानंतर त्यात कोणतीही क्‍युरी आली नाही. या संशोधनातून हवेत किती नायट्रोजनचे प्रमाण आहे, याची अचूक माहिती मिळणार आहे. डिव्हाईस खूप कमी खर्चात उपलब्ध होईल.''

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या प्रोत्साहन व मार्गदर्शनामुळे संशोधन करता आले व त्यास पेटंट प्राप्त झाल्याची भावना डॉ. पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्यानिमित्त त्यांचे प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांच्यासह संकुलाचे संचालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

SCROLL FOR NEXT