Due to lack of mobile network in Bhuiyanj area students are facing difficulties in getting online education 
सातारा

भुईंज परिसरात मोबाईल नेटवर्क गुल; ऑनलाइन शिक्षणाचा बोजवारा

विलास साळुंखे

भुईंज (सातारा) : ऑनलाइन शिक्षणासाठी ऐपत नसतानाही ऍन्ड्रॉईड मोबाईल घेऊन त्यामध्ये सिमकार्ड घालून शिक्षण सुरू झाले आहे. मात्र, वारंवार नेटवर्क गुल होत असल्यामुळे भुईंज, पाचवडसह ग्रामीण भागातील पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे. काही कंपन्यांचे सिमकार्ड चक्क बंद झाल्यामुळे नागरिकांचे संभाषण बंद होत नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 

कोरोनामुळे अद्यापही शाळा, कॉलेज सुरू झालेली नाहीत. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेण्याचे सरकारकडून आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी सर्रास स्मार्टफोनव्दारे शिक्षणाचे धडे गिरवताना दिसत आहेत. मात्र, या भागातील नेटवर्क नेहमी लपंडाव करत असल्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे. दुसऱ्या बाजूने दिवसेंदिवस थ्री जी व फोर जी सेवेच्या नावाखाली सिमकार्डधारक कंपन्या इंटरनेट प्लॅन मोबाईलधारकांना देत आहेत. मात्र, सुविधा देण्यास कमी पडत असल्याने या माध्यमातून सिमकार्डधारकांची कंपन्यांकडून फसवणूक होत आहे. तशा प्रकारच्या तक्रारी अनेक विद्यार्थी व पालकांतून होत आहेत. 

वोडाफोन, आयडिया, जिओ आदी कंपन्यांचे नेटवर्क आलेच तर स्पीड अत्यंत कमी असे प्रकार सुरू आहेत. कंपन्यांच्या या हलगर्जीपणामुळे ऑनलाइन सुविधा देणाऱ्या मल्टीसर्व्हिसवाल्यांनाही मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मोठमोठ्या रकमेची रिचार्च करूनही इंटरनेट सेवा संबंधित कंपन्यांकडून मिळत नसेल तर लोकांचा डेटा जसाचा तसाच परत कंपनीला जात आहे. यातून कंपन्यांचा फायदा अन्‌ मोबाईलधारकांना नाहक आर्थिक फटका सहन करण्याची वेळ येत आहे. यामुळे मोबाईलधारकांसह पालक वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

फसव्या कंपन्यांविरोधात सरकार कारवाई करेल? 

जलद सेवा देण्याचा दावा करणाऱ्या कंपन्या अशा प्रकारे ग्राहकांची फसवणूक करून लूट करत असतील तर या फसव्या कंपन्यांविरोधात सरकार काही कारवाई करेल काय? हाच खरा प्रश्न यानिमित्ताने पालकांसह ग्राहकांसमोर उभा आहे.  

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT