सातारा

जितकरवाडीजवळ कोसळली दरड! लोकांमध्ये पसरले भीतीचे वातावरण

जयभीम कांबळे

जितकरवाडीच्या वरच्या बाजूला असलेला डोंगर खाली घसरल्यामुळे येथील लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

तळमावले (सातारा): गेले दोन दिवसापासून पावसाने ढेबेवाडी, काळगांव विभागाला अक्षरशः झोडपून काढले आहे. वांग मराठवाडी धरणाच्या पाठीमागील बाजूस जिंती हे गाव आहे. या जिंती गावाला जोडणाऱ्या छोटयाछोटया वाडया वस्त्या आहेत. जिंतीपासून साधारणपणे 2 किमी अंतरावर डोंगराच्या कुशीत जितकरवाडी, सावंतवाडी, शिंदेवाडी, भातडेवाडी ही साधारणपणे 20 घरे असलेल्या वस्त्या आहेत. या जितकरवाडीच्या वरच्या बाजूला असलेला डोंगर खाली घसरल्यामुळे येथील लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

विशेष धक्कादायक बाब म्हणजे या घरांपासून काही अंतरावर दोन मोठया दरडी कोसळल्या आहेत. काल रात्रीच्या सुमारास जितकरवाडीच्या जवळच ही घटना घडली आहे. जितकरवाडी मध्ये सुमारे 30 घरे आहेत. नोकरी धंद्यानिमित्त येथील लोक मुंबई, पुणे व अन्य ठिकाणी गेले आहेत. तसेच या सर्व गावांना एकाच पुलावरुन जाता येते. गतवर्षी उद्घाटनापूर्वीच हा पुल वाहून गेला होता. त्यानंतर दोन्ही बाजूला भराव टाकला होता.

मात्र यावर्षीदेखील पावसाने या पुलाच्या दोन्ही बाजूकडील भराव पाण्याने वाहून गेला आहे. त्यामुळे या वाडयांचा संपर्क तुटला आहे. वांग मराठवाडीच्या धरणातील पाण्याचा फुगवटा देखील या गावांकडे पसरला आहे. प्रचंड पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जितकरवाडीच्या लोकांचे नशीब बलवत्तर आहे. घरांपासून काही अंतरावर दरड कोसळली आहे. प्रशासनाने या गोष्टीची तातडीने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी विनंती येथील ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT