Satara Sakal
सातारा

जिल्ह्यात विविध मार्गांवर धावणार ई-बस; पुणे-महाबळेश्‍‍वर, सातारा-पुणे मार्गावर प्रयोग

इंधन दरवाढीमुळे सहन करावा लागणारा तोटा कमी करण्‍यासाठी राज्‍य परिवहन महामंडळाने इलेक्‍ट्रिक बसला पसंती

गिरीश चव्हाण

सातारा : इंधन दरवाढीमुळे सहन करावा लागणारा तोटा कमी करण्‍यासाठी राज्‍य परिवहन महामंडळाने इलेक्‍ट्रिक (Electric Bus) बसला पसंती दिली असून, पहिल्‍या टप्‍प्‍यात दोन हजार बस संपूर्ण राज्‍यासाठी भाडेतत्त्‍वावर घेण्‍याची प्रक्रिया सुरू केली आहे. या निर्णयानुसार सातारा(Satara) आगाराने ८५ मार्गांची चाचपणी करत मार्ग निश्‍चिती केली आहे. पहिल्‍या टप्‍प्‍यात सातारा-पुणे (Satara-Pune) विनाथांबा आणि पुणे-महाबळेश्‍‍वर (Satra Mahabaleshwar) या ई-बस (E-Bus) सुरू करण्‍याचा सातारा आगाराचा मानस आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्‍यासाठी पुकारलेल्‍या लॉकडाउनमुळे एसटी महामंडळाचे कंबरडे मोडले आहे. कोरोनाच्‍या संकटावर मात करत अडचणीतून मार्ग काढत एसटी महामंडळाची वाटचाल सुरू असतानाच डिझेल दरवाढीचा बोजा नव्‍याने महामंडळावर पडत आहे. डिझेल दरवाढीनंतर प्रवासी दरात जास्‍तीची वाढ न करता महामंडळाने नागरिकांना अविरत सेवा देणे सुरूच ठेवले आहे. खर्च आणि उत्‍पन्न यांचा ताळमेळ बसत नसल्‍याने महामंडळासमोरील आर्थिक संकट अधिक गडद होत आहे. हे टाळण्‍यासाठी व इंधनदरवाढीवरील खर्च करण्‍यासाठी महामंडळाने राज्‍याच्‍या विविध भागांत ई-बस चालविण्‍याबाबतची चाचपणी सुरू केली आहे. यासाठी केंद्र शासनाच्‍या फेम योजनेतून दोन हजार ई-बस भाडेतत्त्‍वावर घेण्‍यात येणार आहेत.

पहिल्‍यांदा १०० ई-बस महामंडळ घेणार असून, यासाठी सर्व आगारांना मार्ग निश्‍चिती करण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या होत्‍या. या सूचनेनुसार सातारा आगाराने जिल्ह्यातील ८५ मार्गांची निश्‍चिती केली आहे. यात प्रामुख्‍याने पहिल्‍या टप्‍प्‍यात सातारा-पुणे आणि पुणे- सातारा अशी विनाथांबा सेवा प्रायोगिक तत्त्‍‍वावर लवकरात लवकर सुरू करण्‍याची तयारी सुरू आहे. याचबरोबर पुणे आगारातून पुणे-महाबळेश्‍‍वर या मार्गावर देखील ई-बस चालविण्‍याचा आराखडा तयार करण्‍यात आला असून, त्‍यासाठी सातारा आगाराची मदत घेण्‍यात आली आहे. जास्‍तीची नियमित प्रवासी संख्‍या असणाऱ्या मार्गांवरदेखील पुढील काळात ई-बस चालविण्‍याबाबत महामंडळ निर्णय घेणार असून, त्‍यासाठीची मार्ग निश्‍चिती आगारनिहाय करण्‍यात आली आहे.

उभारावी लागणार चार्जिंग स्‍टेशन्‍स

एक बस तीन तासांच्‍या चार्जिंगनंतर ३०० किलोमीटरचे अंतर तोडू शकते. हे अंतर तोडल्‍यानंतर पुन्‍हा पूर्ण क्षमतेने बसमधील बॅटऱ्या चार्ज होण्‍यासाठी सुमारे तीन तासांचा अवधी लागणार आहे. बॅटऱ्यांची क्षमता आणि चार्जिंगसाठी लागणारा वेळ लक्षात घेत अचूक वेळापत्रकानुसार मार्ग निश्‍चिती करण्‍यावर महामंडळाचा भर आहे. फेरी पूर्ण करून आल्‍यानंतर बॅटऱ्या चार्जिंगसाठी त्‍या आगारात उच्‍चदाब विद्युतवाहिनी असणारी चार्जिंग स्‍टेशन्‍स असणे आवश्‍‍यक आहे. अशी चार्जिंग स्‍टेशन्‍स उभारणीचा आणि विद्युत वाहिनीचा खर्च महामंडळास करावा लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT