Education Officer Rajesh Kshirsagar said that parents should have faith and send their children to school 
सातारा

पालकांनो विश्‍वास ठेवा आणि मुलांना शाळेत पाठवा

प्रशांत घाडगे

सातारा : कोरोनाच्या संसर्गामुळे बंद असलेल्या शाळांचे नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले. मात्र, विद्यार्थी सुरक्षेबाबत शासन व शाळा सज्ज असतानाही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अल्प आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी दररोज शाळांचे निर्जंतुकीकरण, विद्यार्थी-शिक्षकांची थर्मलद्वारे तपासणी, मास्क बंधनकारक व सुरक्षित अंतर ठेवणे या सूत्रांचा वापर केला. कोरोनाची भीती आहे. परंतु, योग्य खबरदारी घेतल्यास सुरक्षित राहता येते, ही मानसिक तयारी करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कोरोनाबाबत दक्षता घेऊन शाळेत उपस्थित राहावे, असे आवाहन माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. 

मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. मात्र, ऑक्‍टोबर महिन्यापासून कोरोना नियंत्रित आल्याने नोव्हेंबर महिन्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता, इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश शाळांना देण्यात आले. त्यानुसार सर्व शाळांत विद्यार्थी व शिक्षक बैठक व्यवस्था, विविध कार्यगट गठीत  करणे, शारीरिक अंतर राखण्यासाठी शालेय परिसरात विविध चिन्हे व खुणा प्रदर्शित करणे, पालकांची संमतीपत्रे घेणे या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली. 

सध्या जिल्ह्यातील एकूण 820 शाळांपैकी 726 शाळा सुरू आहेत. उर्वरित शाळाही टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत. शाळा बंद असताना विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला गेला. परंतु, सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेणे शक्‍य नसल्याचे निदर्शनास आले. तसेच महत्त्वाच्या विषयांसाठी प्रत्यक्ष (ऑफलाइन) अध्यापनाची आवश्‍यकता असल्याचे श्री. क्षीरसागर यांनी सांगितले. 

पालकांनी जास्तीत जास्त संमतीपत्रे द्यावीत 

जिल्ह्यातील शाळांमधील सरासरी 40 टक्के पालकांनीच विद्यार्थी शाळेत पाठविण्यास संमतीपत्रे दिली आहेत. परंतु, अद्यापही विद्यार्थ्यांची उपस्थिती समाधानकारक नाही. त्यामुळे पालकांनी जास्तीत जास्त संमतीपत्रे शाळा प्रशासनाला द्यावीत. पालकांनीही शाळा प्रशासनावर विश्‍वास ठेऊन पाल्यांना शाळेमध्ये पाठवावे. विद्यार्थी व शिक्षक स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत शिक्षणाचे धडे नक्कीच गिरवतील, असाही विश्‍वास श्री. क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg Heritage : दोनशे वर्षांपूर्वीची ब्रिटिशकालीन दोन स्मारके तोडली, मालवणमधील राजकोट किल्ल्याजवळची घटना

पेशव्यांना होतं पैठणीचं आकर्षण! सोळा हात लांब, तीन किलो वजन; शुद्ध सोन्याच्या जरीची पेशवेकालीन पैठणी कशी होती?

Latest Marathi News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघावरून महायुतीत धुसफुस

Shashikant Shinde: पोलिसांविरोधात आमदार शशिकांत शिंदे आक्रमक; कोरेगावात मोर्चा; बैठकीबाबतचे पत्र दोन दिवसांत द्यावे, नेमंक काय प्रकरण..

Devendra Fadnavis : कुंभमेळ्याच्या तयारीला वेग! ७ नोव्हेंबरला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ७ हजार कोटींच्या कामांचे भूमिपूजन

SCROLL FOR NEXT