Election process of Shikshak Bank possible from 20th July satara 
सातारा

गुरुजींच्या निवडणुकीचे लवकरच रिंगण

शिक्षक बॅंकेची निवडणूक प्रक्रिया २० जुलैपासून शक्य; सत्ताधारी-विरोधकांची जोरदार मोर्चेबांधणी

सकाळ वृत्तसेवा

सातारा - प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी येत्या २० तारखेपासून अर्जाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तालुका निबंधक शंकर पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याचे उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आले. त्यामुळे या बॅंकेच्या निवडणुकीसाठी शिक्षकांच्या दोन संघटना भिडणार आहेत. सध्या बॅंकेवर शिक्षक संघाची सत्ता असून आता विरोधातील शिक्षक समितीकडून सत्ता ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशीची व रंगतदार होणार असल्याचे स्पष्‍ट होते.

प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम करण्यात आली आहे. त्यात ९६७९ सभासद असून या निवडणुकीत ते मतदान करणार आहेत. शिक्षक बॅंकेची आजपर्यंतची निवडणूक ही शिक्षक संघ व शिक्षक समिती या पारंपरिक विरोधकांतच चुरशीची व अटीतटीची होते. पण, प्रत्येक वेळी सत्ताबदल होत असल्याने बॅंकेचे सभासद हे सुज्ञ असल्याचे दाखवून दिले आहे. सध्या बॅंकेत शिक्षक संघाचे १६ संचालक असून विरोधी शिक्षक समितीचे चार संचालक आहेत.

आगामी पाच वर्षांसाठी नवीन संचालक निवडीसाठी येत्या २० तारखेपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया होणार आहे. त्याबाबतचा निवडणूक कार्यक्रम तयार करून तो सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. येत्या चार दिवसांत हा कार्यक्रम अंतिम केला जाण्याची शक्यता आहे. साताऱ्याचे तालुका निबंधक शंकर पाटील यांच्याकडे निवडणूक निर्णय अधिकारीपदाची जबाबदारी राहणार असल्याचे उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

समिती-संघात जोरदार संघर्ष

बॅंकेच्या निवडणुकीसाठी शिक्षक संघ व समितीने जोरदार तयारी केली आहे. शिक्षक संघाने गेल्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात केलेल्या सभासदाभिमुख कामाची पावती सभासदांपुढे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात कमी केलेले व्याजदर, मृत सभासदांना कर्जाची सवलत आदी मुद्द्यांचा समावेश आहे. शिक्षक संघ गेल्या पाच वर्षांत दुभंगला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने दुभंगलेला शिक्षक संघ पुन्हा एकत्र येऊन सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार का? याची शिक्षकांत उत्सुकता आहे.

शिक्षक समिती एकसंध असून त्यांनी बॅंक कर्मचारी भरती घोटाळा, व्याजदरात कपात करण्यात सत्ताधाऱ्यांना आलेले अपयश, शाखांचे नूतनीकरण आदी मुद्दे घेऊन सभासदांपुढे जाण्याची तयारी केली आहे. यावेळेस सत्ताधाऱ्यांना पायउतार करण्यासाठी त्यांनी एकजुटीने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यासाठी तालुकानिहाय मेळाव्यांच्या माध्यमातून जागृती सुरू आहे. त्यामुळे शिक्षक समिती व संघ यांच्यात जोरदार संघर्ष या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळणार, हे निश्‍चित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT