फलटण शहर (जि. सातारा) : फलटण तालुक्यातील 80 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारी 2021 रोजी मतदान, तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी कालपासून आचारसंहिता लागू झाली आहे. डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 31 डिसेंबर 2020 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्द केल्या जाणार आहेत.
फलटण तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे :
परहर बु|| या पुनर्वसित, धुळदेव, निंभोरे, ढवळेवाडी (निं), जाधववाडी(फ), सस्तेवाडी, झिरपवाडी, शिंदेनगर, पवारवाडी, सरडे, मुंजवडी, निंबळक, जावली, तिरकवाडी, राजुरी, आंदरुड, सासकल, बोडकेवाडी, निरगुडी, तावडी, विंचूरणी, सांगवी, टाकळवाडे, राजाळे, कांबळेश्वर, कापडगाव, रावडी खु||, जिंती, घाडगेमळा, आळजापूर, शेरेचीवाडी(हिं), वाखरी, हिंगणगाव, वाघोशी, घाडगेवाडी, साठे, बिबी, कोऱ्हाळे, वडगाव, मलवडी, कोळकी, वडजल, आलगुडेवाडी, ठाकुरकी, काशीदवाडी, फरांदवाडी, खुंटे, शिंदेवाडी, भिलकटी, हणमंतवाडी, गुणवरे, कुरवली बु||, नाइकबोमवाडी, मिरढे, शेरेशिंदेवाडी, भाडळी बु||, भाडळी खु||, ढवळ, धुमाळवाडी, सोनगाव, पिंपळवाडी, सोनवडी बु||, सोनवडी खु||, कोरेगाव, आरडगाव, तांबवे, रावडी बु||, तडवळे, डोंबाळवाडी, खराडेवाडी, काळज, होळ, मुरुम, खामगाव, नांदल, मुळीकवाडी, कापशी आदी तालुक्यांतील 80 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. यामुळे ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच व सदस्य पदासाठी इच्छुक असणा-या कार्यकर्त्यांच्या राजकीय हालचालींनाही आता वेग आला आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.