सातारा

कऱ्हाड: सरपंच परिषदेची कार्यकारिणी जाहीर

हेमंत पवार

सरपंच परिषदेचे राज्य अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी कार्यकारिणी जाहीर केली.

कऱ्हाड (सातारा): सरपंच परिषदेच्या कऱ्हाड उत्तर व दक्षिण कार्यकारिणीची निवडी पार पडल्या. सरपंच परिषदेचे राज्य अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी कार्यकारिणी जाहीर केली. सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, परिषदेचे मार्गदर्शक शंकरराव खापे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष सतीश इंगवले यांनी नियुक्तींचे पत्रे प्रदान केली.

येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमास मान्यवरांसह सरपंच उपस्थित होते. राज्यअध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील कार्यकारिणी जाहीर केली. सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा आढावा सांगितला. कऱ्हाड उत्तर व दक्षिणच्या कार्यकारिणीमध्ये गट आणि गण विचारात घेऊन धडाडीने काम करणाऱ्या महिला व पुरुष सरपंच यांची अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, खजिनदार, समन्वयक, प्रसिद्धी प्रमुख, जिल्हा कार्याध्यक्ष यांना नियुक्त पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष इंगवले यांनी मनोगत व्यक्त केले. उपसभापती देशमुख यांनी सरपंच परिषदेमार्फत राज्यामध्ये चांगले काम होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सभापती ताटे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. सरपंच परिषदेचे मार्गदर्शक शंकरराव खापे यांनी प्रास्ताविक केले. संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. जावेद मुल्ला यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हवामानाचा अंदाज अन् पायलटनं फिरवला निर्णय; राहुल गांधींच्या विमानाला का करावं लागलं 'गो-अराउंड'? लँडिंगच्या १० मिनिटांपूर्वी काय घडलं?

Thalapathy Vijay Assembly Row : हनुवटीवर हात अन् MISA कायद्याचा संदर्भ; स्टॅलिन यांच्यावरील 'त्या' कृतीवर विधानसभेत गदारोळ का झाला? थलपथी विजय यांचं स्पष्टीकरण

२ वर्षाची झाली दुआ पादुकोण सिंह! रणवीर- दीपिकाने शेअर केले खास फोटो; अभिनेत्रीच्या बेबी बम्पने वेधलं लक्ष

Education Awards: डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराने स्वारातीमच्या दोन प्राध्यापकांचा गौरव

युद्धाचा भडका आणि जागतिक संकट, तरीही भारतीय अर्थव्यवस्था सुरक्षित कशी? PM मोदींनी स्पष्टच सांगितलं...

SCROLL FOR NEXT