सातारा

सातारा पालिका 'या'साठी काेणत्या मुहूर्ताची वाट पाहतेय

प्रवीण जाधव

सातारा : पालिकेतील लाचप्रकरणी झालेल्या कारवाईला दोन महिने होत आले तरी, गुन्हा दाखल झालेल्या लिपिकांच्या विभागीय चौकशीला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. या विलंबाला कारणीभूत कोण, अशी चर्चा पालिका वर्तुळात होत आहे. या चौकशीला मुहूर्त लागणार कधी, असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.
हा नेता म्हणाला... नियमांचे काटेकोरपणे पालन करा

पालिकेतील घंटागाडीच्या ठेक्‍याची अनामत रक्कम परत देण्यासाठी दोन लाख 30 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सहायक मुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्यासह आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे, प्रवीण यादव व गणेश टोपे यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. जून महिन्यामध्ये ही कारवाई झाली होती. त्यानंतर धुमाळ व तीन आरोग्य निरीक्षकांना या गुन्ह्यात अटक होऊन जामिनावर सुटकाही झाली. सध्या ते प्रकरण न्यायालयात आहे. दरम्यान, या प्रकारामुळे पालिकेतील भ्रष्टाचाराची पाळेमुळे जनतेसमोर आली होती. त्यानंतर सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या होत्या. त्यामुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. तसेच पाकिलेचा कारभार सुधारण्याच्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या होत्या. परंतु, पालिकेचा कारभाऱ्यांनी या गोष्टी फारशा मनावर घेतल्याचे दिसत नाही. अजूनही कारभार योग्य त्या पद्धतीने सुरळीत झाल्याचे दिसत नाही.

आयएएस डॉ. अश्विनी वाकडेंच्या भावाला 'ती' गाेष्ट खटकली हाेती 

अटकेनंतर चारही संशयितांना निलंबित करण्यात आले. त्यातील संचित धुमाळ यांची चौकशी सुरू झाली. परंतु, तीन आरोग्य निरीक्षकांची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. दोन महिन्यांमध्ये अशा प्रकारची चौकशी पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना कामावर रूजू करून घेण्याचाही निर्णय होऊ शकतो. परंतु, पालिका व्यवस्थापनाला अद्याप या चौकशीचा मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे चौकशीचे घोडे कशात अडकलेय, असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे. 
दोन महिन्यांमध्ये चौकशी करणे अपेक्षित असते. त्यामध्ये संबंधितांकडे असलेल्या जबाबदाऱ्या व त्यात असलेल्या त्रुटींचीही चौकशी होत असते. त्याचबरोबर लाच प्रकरणात नेमका यांचा काय सहभाग आहे, याचाही विचार होत असतो. परंतु, पालिका व्यवस्थापनाने अद्याप चौकशीचा आराखडा व रूपरेषाच तयार केलेली नाही. 

सध्या आस्थापना विभागाने आरोग्य विभागाला पत्र दिले आहे. त्यामध्ये या तिघांची कोणत्या मुद्यांवर चौकशी करावयाची, याबाबत मार्गदर्शन मागितले आहे. परंतु, त्याला काय उत्तर द्यायचे, हेच आरोग्य विभागाचे अद्याप ठरेना झाले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून रूपरेशा ठरून, मुख्याधिकाऱ्यांकडे तेथून नगरपरिषद संचलनालयाकडे जाणार, त्यानंतर चौकशी अधिकारी नेमून चौकशी होणार व त्याचा निष्कर्ष स्थायी समितीपुढे कधी येणार, हा मुद्दा आहे. त्यामुळे पालिकेतील अशा प्रकरणांची व्याप्ती नेमकी किती आहे, हे कधी समोर येणार, असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर जैन बोर्डिंगचा जमीन खरेदी व्यवहार रद्द, गोखले बिल्डर्सचा मोठा निर्णय

Female Doctor Case: हे तर गलिच्छ राजकारण, महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रणजितसिंह यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच सांगितलं..

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर, काय आहे कारण?

'शर्टमध्ये हात घालत त्याने किस केलं...' अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाली...'वडिलांच्या वयाच्या दिग्दर्शकाने...'

Highway Traffic: संपली सुटी; महामार्गावर प्रवाशांची गर्दी; कोल्हापूर नाका, मलकापुरात वाहनचालक वैतागले..

SCROLL FOR NEXT