Mahabaleshwar Project esakal
सातारा

Mahabaleshwar Project : तब्बल 235 गावांचा समावेश असलेल्या 'नवीन महाबळेश्वर'ला वाढता विरोध; काय आहे कारण?

नवीन महाबळेश्वर प्रकल्पामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासह पश्चिम घाटातील निर्बंध असलेल्या भागात हस्तक्षेप होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवीन महाबळेश्वर प्रकल्पात सातारा तालुक्यातील ३४, जावळीतील ४६, महाबळेश्वर तालुक्यातील ६० तर पाटण तालुक्यातील ९५ गावे अशी एकूण २३५ गावांचा समावेश केला आहे.

सातारा : नवीन महाबळेश्वर प्रकल्पामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासह पश्चिम घाटातील निर्बंध असलेल्या भागात हस्तक्षेप होणार आहे. या भागाच्या शाश्वत विकासामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार असून, पर्यटन वाढल्याने मोठ्या प्रमाणात लोक या भागात येणार असल्याने पर्यावरणाचा असमतोल निर्माण करू शकतो. त्यामुळे या प्रकल्पाला आज साताऱ्यातील पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवत हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली.

हा प्रकल्प करताना स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घ्यावे, अन्यथा आम्हीही या प्रकल्पाला विरोध करू, असेही स्पष्ट केले. सातारा पंचायत समितीत एमएसआरडीसीकडून नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या संभाव्य आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी साताऱ्यातील पर्यावरणप्रेमींनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला.

या बैठकीला एमएसआरडीसीचे अधिकारी, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शिवाजी राऊत, अस्लम तडसरकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे तसेच या प्रकल्पात समाविष्ट होणारी तालुक्यातील ३४ गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.

नवीन महाबळेश्वर प्रकल्पात सातारा तालुक्यातील ३४ गावांचा समावेश असून, या प्रकल्पाला आमचा विरोध नाही. पण, येथील स्थानिकांना यामध्ये सामावून घेऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध कराव्यात, अशी अपेक्षा सातारा तालुक्यातील नवीन महाबळेश्वरमध्ये समाविष्ट होणाऱ्या गावांतील ग्रामस्थांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांपुढे व्यक्त केली. स्थानिकांना सामावून घेतले नाही, तर या प्रकल्पाला विरोध राहील, असे ग्रामस्थांनी सांगितले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या प्रकल्पाबाबत आम्ही ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले असून, ते आम्ही शासनापर्यंत पोचवू, असे सांगितले. या वेळी पर्यावरणप्रेमींनी या प्रकल्पाला जोरदार विरोध केला.

शिवाजी राऊत म्हणाले, ‘‘या प्रकल्पात जिल्ह्यातील चार तालुक्यांतील २३५ गावांतील हजारो हेक्टर जमिनी ताब्यात घेऊन त्यातून रस्ते काढून पश्चिम घाटातील डोंगर उद्ध्वस्त केले जाणार आहेत. यातून एक लाख ८० हजार लोकसंख्येच्या शेतकऱ्यांचे जीवन व त्यांचा निसर्ग उद्ध्वस्त होणार आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवांच्या शिकारीचे प्रमाण वाढणार असून, या प्रकल्पाला हानी पोचणार आहे. त्यामुळे हा विनाशकारी प्रकल्प रद्द करावा.’’

स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकल्पाबाबत ग्रामपंचायतींचा ठराव घ्यावा, तसेच आम्हाला विश्वासात घेऊन आमच्यावर अन्याय होणार नाही, याची हमी देण्यात यावी. बांधकामासंदर्भातील एक हजार मीटरची अट शिथिल करावी, एमएसआयडीसीचे नागठाणे येथील कार्यालय साताऱ्यात स्थलांतरित करावे, आदी मागण्या केल्या.

२३५ गावांचा समावेश

नवीन महाबळेश्वर प्रकल्पात सातारा तालुक्यातील ३४, जावळीतील ४६, महाबळेश्वर तालुक्यातील ६० तर पाटण तालुक्यातील ९५ गावे अशी एकूण २३५ गावांचा समावेश केला आहे. त्यासाठी एमएसआरडीसीने त्याचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यातही या प्रकल्पामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासह पश्चिम घाटातील निर्बंध असलेल्या भागात हस्तक्षेप वाढणार आहे. या भागाच्या विकासामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन पर्यटन वाढल्याने पर्यावरणाचा असमतोल निर्माण होणार असल्याचेही म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT