सातारा

धक्कादायक! वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शॉक बसून शेतकऱ्याचा मृत्यू 

संदीप गाडवे

केळघर (जि. सातारा) : वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे काल (ता. २१) सकाळी येथील शेतकरी नारायण किसन पार्टे यांचा शॉक बसून दुर्दैवी मृत्यू झाला. या शेतकऱ्याचा मृत्यू वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे झाला असून, मृत शेतकऱ्याच्या वारसांना वीज वितरण कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

वीज वितरण कंपनीच्या वायरमनच्या चुकीमुळे या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला असून, वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येत नाहीत, तोपर्यंत पंचनामा करून देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. अखेर तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन चर्चा करून मृत शेतकऱ्याच्या वारसांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची सूचना केली. या दुर्घटनेला वायरमन जबाबदार असून, त्याला तातडीने निलंबित करावे, अशी मागणीही संतप्त ग्रामस्थांनी केली. यावर दोषी वायरमनवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शाखा अभियंता राहुल कवठे, दत्तात्रय जरे यांनी दिले.

..अखेर माण तालुक्‍याच्या एमआयडीसीचा प्रश्न मार्गी; युवकांना मोठा दिलासा
 
याबाबत माहिती अशी की, येथील शेतकरी नारायण किसन पार्टे हे पट्टीचा तळ या शिवारात जनावरांना वैरण आणण्यासाठी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास गेले होते. ते लवकर घरी आले नाहीत, म्हणून त्यांना पाहण्यासाठी त्यांची पत्नी त्यांच्या शेतात गेली असता, त्यांना त्यांचे पती नारायण पार्टे हे विजेची तार हातात असलेल्या अवस्थेत आढळून आले. विजेची तार शेतात खाली पडली होती. तुटलेल्या विजेचा तारेचा धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांच्या पत्नीने आरडाओरडा करून ग्रामस्थांना गोळा केले. त्यावेळी ग्रामस्थांनी गावाला पुरवठा करणारी मुख्य वाहिनी तातडीने बंद केली. तत्काळ याची माहिती ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिसांना दिली.

या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, सहायक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड, जिल्हा परिषद सदस्या अर्चना रांजणे, सरपंच रवींद्र सल्लक, मंडलाधिकारी ए. ए. मेमन, तलाठी संदीप ढाकणे यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र, चार-पाच तास उलटून गेले तरी वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी न आल्याने संतप्त ग्रामस्थांनी वीज कंपनीचे अधिकारी आल्याशिवाय मृतदेहाचा पंचनामा करून देणार नाही, अशी भूमिका घेतली. या दुर्दैवी घटनेला वीज वितरण कंपनीचे वायरमन जबाबदार असून, त्याला निलंबित करावे, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली. तहसीलदार पाटील यांनी तत्काळ दोषींवर कारवाई करण्याची सूचना वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली. यावर शाखा अभियंता राहुल कवठे यांनी दोषी वायरमनला निलंबित करणार असून, मृत शेतकऱ्याच्या वारसांना वीज वितरण कंपनीकडून जास्तीत-जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिल्यावर संतप्त ग्रामस्थ शांत झाले. मृत शेतकरी नारायण पार्टे यांच्या मागे पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. 

 
केळघर येथे घडलेली घटना दुर्दैवी असून मृत शेतकरी पार्टे यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेतून नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, तसेच वीज वितरण कंपनीने दोन दिवसांत ग्रामस्थांच्या तक्रारीचे निवारण करावे, अशी सूचना तहसीलदार शरद पाटील यांनी संबंधित अधिका-यांना दिली आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Sangli Milk Collection Drop : FDA च्या धाडींमुळे सांगलीतील दुधाचा 'बनावट खेळ' बंद? तब्बल 78 हजार लिटरने दुधाची आवक घटली; पाहा आकडेवारी

Marathi News Live Updates : बीडच्या इमामपूरचंही नाव बदलणार? मंत्री भरत गोगावलेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Shivsena Express: कोकण प्रवास मोफत करता येणार, गणेशोत्सवासाठी मुंबईतून विशेष ट्रेन सुटणार; कुठून आणि कधी?

SCROLL FOR NEXT