soya bean e sakal
सातारा

शेतकऱ्यांच्या सोयाबीनवर व्यापाऱ्यांचा दरोडा; 'बळीराजा' संघटनेचा आरोप

मुजोर व्यापाऱ्यांनी सोयाबीनचे दर संगनमताने पाडुन चार ते पाच हाजांरावर आणले आहेत.

हेमंत पवार

कऱ्हाड - मुजोर व्यापाऱ्यांनी सोयाबीनचे दर संगनमताने पाडुन चार ते पाच हाजांरावर आणले आहेत. सोयाबीनची गुणवत्ता तपासणीच्या आडून शेतकऱ्यांनी घामाने पिकविलेल्या शेतीमालावर व्यापारी दरोडाच टाकत आहेत. जिल्हा उपनिबंधकांनी संबंधितांवर कारवाई करावी. अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना जिल्हा उपनिबंधकांना काळे फासेल, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला यांनी निवेदनाव्दारे तहसीलदार व उपनिबंधकांना दिला आहे.

निवेदनातील माहिती अशी -

कोरोना, महापूर, अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्वतःच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी शेतकरी सोयाबीन मळणी झाल्यानंतर लगेच विकण्यासाठी घेऊन येत असतो. सोयाबीन साठवणूक करण्यासाठी अपुरी जागा याचा गैरफायदा मुजोर व्यापारी घेतात. सोयाबीनची गुणवत्ता तपासण्यासाठी व्यापारी मशिनचा वापर करतात. मुळात या मशिनला कोणतीही कायदेशीर मान्यता नाही. त्यातूनच व्यापारी शेतकऱ्यांनी घामाने पिकविलेल्या सोयाबीनची गुणवत्ता तपासणीच्या आडून शेतकऱ्यांच्या घामाने पिकविलेल्या मालावर दरोडाच टाकत आहेत.

सोयाबीन मळणी केल्यानंतर विक्रीला आणल्यानंतर पाच किलोची तुट शेतकरी ग्रुहीत धरतो. परंतु व्यापारी २० ते २५ किलोची घट दाखवून शेतकऱ्यांची अडवणूक करतात. व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत आहेत. जिल्हा उपनिबंधक यांनी सातारा जिल्ह्यातील आपल्या कार्यालयांना योग्य ते आदेश देऊन संबंधितांवर कारवाई करण्यास भाग पाडावे. अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना जिल्हा उपनिबंधकांना काळे फासेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष मुल्ला निवेदनाव्दारे दिला आहे. यावेळी सुनील कोळी, आकाश रेठरेकर, सागर कांबळे व शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT