सातारा

अतिवृष्टीची भरपाई देवदिवाळीला तरी द्या; शेतकऱ्यांचे प्रशासनाला साकडे

उमेश बांबरे

सातारा : ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले. पंचनामे होऊन शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली. या नुकसानीपोटी जिल्ह्याला 17 कोटी 21 लाखांची भरपाईही मिळाली. ही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांकडे जमा करण्यासाठी वर्ग झाली. पण, अद्याप ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. अतिवृष्टीची भरपाई दिवाळीपर्यंत खात्यावर जमा करणाऱ्या जिल्हा प्रशासनाने आता देवदिवाळीपर्यंत तरी रक्कम जमा करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. 

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात जून ते ऑक्‍टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत 24 हजार 23 हेक्‍टर क्षेत्रावरील शेतीचे 33 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झाले. त्यामध्ये जून ते ऑगस्टअखेर 74.64 हेक्‍टर, सप्टेंबरमध्ये 1362.62 हेक्‍टर, तर ऑक्‍टोबरमध्ये 22585.15 हेक्‍टरवरील शेतीचा समावेश होता. जिरायत पिकांखालील 23 हजार 491 हेक्‍टरवरील 81 हजार 666 शेतकऱ्यांचा समावेश होता. बहुवार्षिक पिकांखालील 531.57 हेक्‍टरवरील 1,175 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. दोन्ही प्रकारच्या नुकसानीपोटी शासनाकडे 17 कोटी 21 लाख 95 हजारांची भरपाईची मागणी करण्यात आली होती.

शासनाने जिरायत व आश्‍वासित सिंचनाखालील पिकांना प्रति हेक्‍टर 6,800 रुपयांप्रमाणे दोन हेक्‍टरच्या मर्यादेत व बहुवार्षिक पिकांसाठी 18 हजार रुपये प्रति हेक्‍टरप्रमाणे दोन हेक्‍टरच्या मर्यादेत मदत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शासनाकडून 17 कोटी 21 लाख रुपये भरपाई जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा झाली. ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. पण, देवदिवाळी आली तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही भरपाईची रक्कम जमा झालेली नाही. काही तालुक्‍यांत थोड्या फार प्रमाणात भरपाईचे वाटप झालेले आहे. पण, दुष्काळी तालुक्‍यांसह इतर तालुक्‍यांतील शेतकरी अद्याप या मदतीची वाट पाहत बसलेले आहेत. तहसीलदारांकडून या मदतीचे वाटप का झालेले नाही, याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेणे आवश्‍यक आहे. सध्या शेतकऱ्यांना पैशाची आवश्‍यकता असून येत्या देवदिवाळीपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. 

प्रशासनाकडून शेतकऱ्यांबाबत दुजाभाव 
केंद्र सरकारच्या कृषीविषयक विधेयकाच्या विरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास संपूर्ण देशभरातून पाठिंबा दिला जात आहे. अशा परिस्थितीत सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही या आंदोलनास पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जिल्ह्यातील शेतकऱ्यांबाबतही प्रशासनाकडून होत असलेला दुजाभाव लक्षात घेता पंजाब असो की महाराष्ट्र सर्वत्र शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे चित्र आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत सतेज पाटलांनी डीजेच्या तालावर धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT