बळीराजाचे आझाद मैदानावर आंदोलन sakal
सातारा

सातारा : शेतकऱ्यांचे आझाद मैदानावर आंदोलन

नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे

हेमंत पवार

कऱ्हाड : नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना (farmers) ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे, शेती पंपाला(agro pump) दिवसा आठ तास मोफत विज(eletricity) द्यावी, दुधाच्या खरेदीची बिले मिळावी, राज्यात गुंठेवारी विक्री सुरु करावी आदी मागण्यांसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने गुरुवारी (ता. २३) मुंबईतील आझाद मैदानावर शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी आज दिली. दरम्यान या प्रश्नावर मुख्य सचिवांनी त्यांच्या स्तरावर तोडगा न काढल्यास गेट वे ऑफ इंडीया(Gateway Of India)येथे जावुन समुद्रात जलसमाधी घेतील, असा इशाराही त्यांनी दिली आहे.

आंदोलनाची माहिती देण्यासाठी आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, चंद्रकांत यादव, अशोक पाटील, उत्तमराव खबाले, पोपट थोरात आदि उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले, राज्य सरकाराने दोन वर्षापुर्वी नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी सावकारांकडुन कर्ज घेवुन बॅँकांचे कर्ज भरले. मात्र आजअखेर एक रुपायाही मिळालेला नाही. संपुर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती. तीही अजुन झालेली नाही. सरकारने शेती पंपाला दिवसा आठ तास विज मोफत देण्याची घोषणा केली होती. तीही सत्यात उतरली नाही. रात्री विज दिली जात असल्याने शेतकऱ्यांना बिबट्यासारख्या वन्य प्राण्यामुळे जीवास मुकावे लागत आहे. त्यामुळे तातडीने दिवसा वीज मिळावी.

सध्या दुधाची खरेदी किलोवर केली जात आहे. मात्र त्याची बिले लिटरवर दिली जात आहेत. हा शेतकऱ्यांवर दरोडा टाकण्याचा प्रकार आहे. तो बंद करावा. राज्यात गुंठेवारी खरेदी-विक्री बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. शेतकऱ्यांना गरजेवेळी दोन-चार गुंठे जमीन विकुन त्याला गरज भागवता येत होती. मात्र गुंठेवारी बंद केल्याने अडचण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला जगुही द्यायचे नाही आणि मरुनही द्यायचे नाही असे सरकारचे धोरण आहे. त्याविरोधात आम्ही गुरुवारी मुंबईच्या आझाद मैदानावर सकाळी अकरा वाजता धरणे आंदोलन करत आहोत. त्यासाठी राज्यातुन शेतकरी येणार आहेत. राज्य सरकारचे मुख्य सचीव यांनी त्यांच्या स्तरावर या प्रश्नांचा निर्णय घ्यावा. अन्यथा शेतकरी गे वे ऑफ इंडीया येथे जावुन समुद्रात जलसमाधी घेतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

Crude Oil: होर्मुझ तणावात भारताचा 'ऑइल मास्टरस्ट्रोक’! कच्चे तेल आणण्यासाठी नवा मार्ग; रशिया ठरला गेमचेंजर...

Latest Marathi News Live Update : विशाळगडावरील कुर्बनीला कोल्हापूर सर्किट बेंचकडून परवानगी

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी खालावली; सातारा-सांगलीसह संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली, 'महाजनकोची' वीजनिर्मिती बंद पडल्यास काय होणार?

Chanakya Life Guide : लोक अचानकपणे तुम्हाला इज्जत देणं का बंद करतात? तुमचं कुठं चुकतं पाहा

SCROLL FOR NEXT