father and son died after drinking ayurvedic kadha in phaltan 
सातारा

Satara News : आयुर्वेदिक काढ्याने घेतला बाप-लेकाचा जीव! घटनेने परिसरात हळहळ… नेमकं काय झालं?

रोहित कणसे

रात्रीचे जेवण केल्यानंतर आयुर्वेदिक काढा पिल्याने बाप-लेकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री जेवण केल्यानंतर वडिलांसह मुलांनी आयुर्वेदिक काढा घेतला. त्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला. तिघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, वडील आणि मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. तर मुलीला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. हणमंतराव रामभाऊ पोतेकर (वय ५५ वर्ष) आणि अमित पोतेकर (वय ३२ वर्ष) अशी मृत बाप-लेकांची नावे असून मुलगी श्रद्धा पोतेकर हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रात्रीच्या जेवणानंतर मध्यरात्री अचानक या तीघांना त्रास सुरू झाला. यामुळे त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू वडील हनुमंतराव व मुलगा अमित यांचा अवघ्या १५ मिनिटांच्या अंतराने मृत्यू झाला. तर मुलगी श्रद्धा हिला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.

या घटनेनंतर मृत्यूच्या कारणांचा शोध घेतला जात असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. मात्र या घटनेत मुलगा आणि वडिल यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : ...तर माझे खासदार का फोडले- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT