सातारा

शेतक-यांनाे! हळद पाेत्यात 50 किलाेच आणा; मिळताेय 15 हजारांचा भाव

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्डवर नवीन हळदीची आवक सुरू झाली आहे. 700 पोती नवीन हळदीची आवक झाली. यावेळी हळदीचा प्रति क्विंटल 15 हजार रुपये इतका उच्चांकी दर मोहनशेठ ओसवाल यांच्या काट्यावर ज्ञानेश्वर विठ्ठल शिंगटे यांच्या हळदीला मिळाला.
 
नवीन हळदीचे लिलावाचा प्रारंभ सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक नितीन पाटील यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव म्हसकर, तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पिसाळ, रमेश गायकवाड, उद्योजक मनीष भंडारे, अरविंद कुदळे, राजेंद्र कदम, संतोष पिसाळ, तसेच तालुक्‍यातील हळद उत्पादक शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आपला हळद माल निवडून व स्वच्छ करून, वाळवून मार्केट यार्डवर लिलावासाठी आणावा. हळद शेंग, गाठ, कोचा, कणी अशी मालाची ग्रेडिंग करून 50 किलोच्या पोत्यामध्येच विक्रीसाठी आणावा. 

अडत व्यापाऱ्यांना नियमितपणे लिलाव काढण्याबाबत, वेळेवर पेमेंट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे सभापती लक्ष्मणराव पिसाळ यांनी सांगितले. उपसभापती दीपक बाबर यांनी स्वागत केले. यावेळी संचालक मोहन जाधव, अंकुश कुंभार, दत्तात्रय भणगे, प्रकाश साळुंखे, हणमंत चव्हाण, दत्तात्रय जमदाडे, हारुणभाई बागवान, गणेश बनसोडे, शारदा गायकवाड, बबई लोळे, नामदेव हिरवे, व्यापारी मोहनशेठ ओसवाल, कांतीलाल ओसवाल, हिराशेठ जैन, मिठालाल जैन, कांतीलाल भुरमल, शंकरशेठ, मदनलाल ओसवाल, प्रवीण ओसवाल, कन्हैय्या गांधी, विनोद पावशे, शंकर जाधव, सचिन जेधे, रवी कोरडे, बाजार समितीचे सहसचिव प्रताप शिंदे उपस्थित होते.

अमिर खानावर कारवाई केलेले हवालदार संजय साबळे पुन्हा चर्चेत

महाबळेश्वरातील वनसदृश जमिनीबाबत शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून घ्या : ऍड. असीम सरोदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT