Santoshi Steel Furniture and Electronic esakal
सातारा

सातारा-लातूर महामार्गावरील फर्निचरच्या शाेरुमला भीषण आग; आगीत लाखोंचं नुकसान, चारजण जखमी

अग्निशामक यंत्रणा मात्र वेळेवर पोचू शकली नव्हती.

फिरोज तांबोळी

अग्निशामक यंत्रणा मात्र वेळेवर पोचू शकली नव्हती.

गोंदवले (सातारा) : येथील सातारा-लातूर महामार्गालगत (Satara-Latur Highway) असलेल्या संतोषी स्टील फर्निचर अॅण्ड इलेक्ट्रॉनिक या (Santoshi Steel Furniture and Electronic) दुकानाला आज पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालं. तर, आग विझवताना चार जण किरकोळ जखमी झाले. शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज पहाटे साडेतीनच्या सुमाराला या दुकानाला आग लागली. या दुकानाला लागून राहत असलेल्या नवले कुटुंबाच्या निदर्शनास ही आग आली. त्यावेळी दौलत नवले यांनी दुकान मालक नामदेव भिंगारे यांना हाका मारून बोलावलं. त्यानंतर दुकानाचं शटर उघडलं असता, दुकानाच्या समोरील भागात भीषण आग लागल्याचं दिसलं. लोकांच्या आरडाओरड्यानं परिसरातील इतर लोकांनीही घटनास्थळी धाव घेतली. दुकानाशेजारील हातपंपाचे पाणी उपसून लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात येत नव्हती.

त्यामुळं गावातून ग्रामपंचायत सदस्य गुरुदत्त कुलकर्णी यांना फोन करून त्यांचा पाण्याचा खासगी टँकर बोलवण्यात आला. त्यानंतर बऱ्याच वेळानं ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं. या आगीत दुकानातील विद्युत इन्व्हर्टरसाठीच्या बॅटऱ्या फुटल्या. तसेच दुकानातील इतर फर्निचर व माल जाळून खाक झाल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. आग लागल्याचं समजताच दहिवडी पोलीस (Dahiwadi Police) घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक यंत्रणा मात्र वेळेवर पोचू शकली नव्हती. दरम्यान, दुकानाला लागलेली आग विझविण्यासाठी मालक नामदेव भिंगारे व ज्ञानेश्वर भिंगारे यांच्यासह त्यांची मुलं आग विझविताना किरकोळ जखमी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT