Corona positive  SAKAL
सातारा

कऱ्हाडला दोन नायब तहसिलदारांसह पाच कर्मचारी पॉझिटीव्ह

कऱ्हाड तालुक्यात आठवड्यापासून कोविड पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

हेमंत पवार

कऱ्हाड : कऱ्हाड (जि.सातारा) येथील तहसीलदार काल कोविड पॉझीटीव्ह (covid positive)आले. त्यानंतर त्यांच्या कार्यालयातील शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचीच कोवीड तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दोन नायब तहसीलदारांसह(deputy tehsildars) पाच कर्मचारी कोविड पॉझीटीव्ह आले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.कऱ्हाड तालुक्यात आठवड्यापासून कोविड पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे तालुक्याची चिंता वाढली आहे.

तहसीलदार विजय पवार हे फिल्डवर कार्यरत असतानाच त्यांना काही त्रास सुरु झाला. त्यांची तपासणी केल्यावर ते स्वतःच पॉझीटीव्ह आले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कार्यालयातील एक कर्मचारीही काल बाधीत सापडला होता. त्यानंतर शहरातील नागरी आरोग्य केंद्राच्यावतीने तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये दोन नायब तहसीलदारांसह पाच कर्मचारी बाधीत सापडले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. यामुळे आता तहसीलदार कार्यालयात कामासाठी येणाऱ्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत का याची तपासणी करुनच आत सोडले जात आहे.(satara Corona Update)

कऱ्हाड तालुक्यातील सर्वांनी कोरोना नियमांचे व प्रशासनाच्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करावे. काही लक्षणे असल्यास तात्काळ कोरोना तपासणी करुन घ्यावी. प्रशासनाचे नियम पाळून सहकार्य करावे.

-उत्तम दिघे प्रांताधिकारी, कऱ्हाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT