सातारा

"आगामी निवडणुका पूर्ण क्षमतेने लढा"

किरण बोळे

श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दो-यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चांगली उर्जा मिळाल्याचे चित्र या निमित्ताने दिसून आले.

फलटण शहर (सातारा): आगामी काळात येवू घातलेल्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुर्ण क्षमतेने लढवाव्यात. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पुर्ण ताकद दिली जाईल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

फलटण येथे काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी चव्हाण यांनी फलटण शहर व ग्रामीण भागातील प्रश्न व समस्या जाणून घेतल्या. ग्रामीण भागातील विविध विषयावर व शहरातील आरोग्य, रस्ते, गटारे, शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, आवश्यक उपाययोजना, मलठण येथील प्रलंबित पोलीस चौकी आदी प्रश्नांची माहिती काँग्रेसच्या पदाधिका-यांनी आमदार चव्हाण यांना दिली. चर्चे दरम्यान सदरचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण परीपुर्ण प्रयत्न करु, अशी ग्वाहीही चव्हाण यांनी दिली. श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दो-यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चांगली उर्जा मिळाल्याचे चित्र या निमित्ताने दिसून आले.

प्रारंभी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वागत काँग्रेसचे फलटण तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी-बेडके यांनी केले. यावेळी फलटण तालुका कार्याध्यक्ष अमीर शेख, शहराध्यक्ष पंकज पवार, जिल्हा सरचिटणीस शंकरराव लोखंडे, अनू.जाती सेलचे जिल्हा उपाध्यक्ष सिध्दार्थ दैठणकर, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे, युवक चे तालुकाध्यक्ष अजिंक्य कदम, युवकचे शहराध्यक्ष प्रितम जगदाळे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष ताजूद्दीन बागवान, शहराध्यक्ष अल्ताफ पठाण, अनू.जाती सेलचे तालुकाध्यक्ष अतुल कांबळे, उपाध्यक्ष मोहित बार्शीकर, नितीन जाधव, एल. जी. बेंद्रे सर, सोपानराव जाधव,ठोंबरे सर आदींची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT