Fraud esakal
सातारा

नोकरीच्या आमिषाने पुणे-साताऱ्यातील माजी सैनिकांची फसवणूक; वाईत लाखो रुपयांना गंडा

नोकरीचे आमिष दाखवून एका भामट्याने व दोन महिलांनी प्रशिक्षणाच्या नावाखाली पैसे घेऊन माजी सैनिकांची फसवणूक केलीय.

भद्रेश भाटे

वाई (सातारा) : नोकरीचे आमिष दाखवून एका भामट्याने व दोन महिलांनी प्रशिक्षणाच्या नावाखाली पैसे घेऊन सातारा व पुणे जिल्ह्यातील माजी सैनिकांची (Ex-servicemen), सिव्हिल गार्ड व महिलांची फसवणूक (Fraud) करून लाखो रुपयांना गंडा घातल्याची आणि त्याबाबत तक्रार करूनही वाई पोलिस त्याची दखल घेत नसल्याची तक्रार माजी सैनिक रवींद्र गालिंदे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे केली आहे. (Fraud Of Ex-servicemen From Pune-Satara At Wai Satara News)

त्यांनी याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की राजेश रामचंदर वैद्य (पत्ता माहीत नाही) याने वाईतील दोन महिलांना हाताशी धरून ब्येरेट सिक्‍युरिटी सर्व्हिसेस व फॅसिलिटी नावाची संस्था स्थापन केली. सावंत सिटी येथील एक बंगला भाड्याने घेऊन ऑफिस सुरू केले होते. या संस्थेकडे शिरवळ, खंडाळा येथील कंपन्यांचे कॉन्ट्रॅक्‍ट मिळाले असून, त्यामध्ये दरमहा 18 ते 28 हजार रुपये अशा पगाराची नोकरी देतो, अशी जाहिरात नोव्हेंबर 2020 मध्ये केली होती. त्यानुसार अनेक माजी सैनिकांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्या वेळी प्रशिक्षण व इतर कारण देऊन सुरक्षा रक्षक पदासाठी प्रत्येकी सात हजार, सिव्हिल गार्डसाठी साडेतीन हजार व लेडीज गार्डसाठी अडीच हजार अशी रक्कम घेतली. अशाप्रकारे त्याने सुमारे चार ते पाच लाख रुपये गोळा केले. मात्र, त्यानंतर चार पाच महिने होऊनही कोणतेही काम अथवा प्रशिक्षण दिले नाही. दिलेली रक्कम मागितली तर ती देण्यास टाळाटाळ केली. दरम्यान राजेश वैद्य अचानक गायब झाला.

त्यामुळे ही संस्था बोगस असून, आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने वाई, सातारा, पाटण, भोर, राजापूर येथील 15 ते 16 माजी सैनिकांनी याबाबत 10 फेब्रुवारी 2021 रोजी वाई पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यामध्ये सुमारे 100 जणांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. मात्र, पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली नाही, असे जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी सांगितले, की माजी सैनिकांनी दिलेल्या तक्रारीची चौकशी सुरू असून, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे त्यास विलंब झाला. लवकरच चौकशी पूर्ण करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मात्र, अशा प्रकारे बोगस संस्था व व्यक्तीमार्फत होणारी आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी कोणताही व्यवहार करण्यापूर्वी संबंधित व्यक्ती अथवा संस्था याची खात्री करणे गरजेचे आहे.

Fraud Of Ex-servicemen From Pune-Satara At Wai Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

SCROLL FOR NEXT