Karve Health Subcentre esakal
सातारा

धक्कादायक! कार्वे आरोग्य केंद्रासमोरच 'कचरा डेपो'

अमोल जाधव

रेठरे बुद्रुक (सातारा) : कार्वे येथील आरोग्य उपकेंद्राची (Karve Health Subcentre) इमारत गेली 20 वर्षे बंद आहे. उपकेंद्र कार्यान्वित ठेवण्यात ग्रामपंचायत व आरोग्य विभाग (Gram Panchayat and Health Department) अपयशी ठरल्याने त्या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. कोरोना (coronavirus) संकटात त्या इमारतीतून आरोग्यसेवा मिळण्याऐवजी तेथे कोणी काहीही कचरा, शेणखत टाकत आहेत. त्यामुळे तेथे उकिरडा तयार झाला आहे. तेथील परिस्थिती बदलण्यासाठी कोणीच पुढाकार घेताना दिसत नाही. (Garbage Depot In Front Of Karve Health Center Is Dangerous To The Health Of Citizens)

वडगाव हवेली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कार्वे येथे आरोग्य उपकेंद्र आहे. त्यामार्फत आरोग्यसेवा पुरवली जाते.

वडगाव हवेली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कार्वे येथे आरोग्य उपकेंद्र आहे. त्यामार्फत आरोग्यसेवा पुरवली जाते. गावामध्ये सुमारे चार गुंठ्यात उपकेंद्राची इमारत आहे. सुमारे 20 वर्षांपासून ती इमारत वापराविना पडून आहे. सध्या चावडी चौकातील एका खोलीत उपकेंद्राचे कामकाज सुरू आहे. उपकेंद्राची इमारत वापराविना पडून असल्याने तेथे दुर्गंधी पसरली आहे.

इमारत बंद असल्यामुळे परिसरात उकिरडा झाला आहे. त्या परिसरात शेणखत, जनावरांचा चारा टाकला जात आहे. ट्रॅक्‍टर, अवजारेही लावलेली आहेत. इमारत बंद असल्याने तेथे उकिरडा झाला आहे. कोरोना संकट काळातही उपकेंद्र कुलूपबंद आहे. लोकांना अन्यत्र असलेल्या तात्पुरत्या उपकेंद्रात हेलपाटे मारावे लागत आहेत.

Garbage Depot In Front Of Karve Health Center Is Dangerous To The Health Of Citizens

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : उद्या ठाकरेंचा विजयी मेळावा- वरळी डोममध्ये तयारी सुरु

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

SCROLL FOR NEXT