corona testing
corona testing corona testing
सातारा

सातारकरांनाे! सिव्हिलला निघालात? थांबा, RT-PCR लॅब पडलीय बंद

प्रवीण जाधव

सातारा : तांत्रिक बिघाडामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातील आरटीपीसीआर (RT-PCR) लॅब बंद आहे. त्यामुळे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी मुंबईला (Mumbai) पाठवावे लागत आहेत. परिणामी कोरोना चाचणीचे अहवाल (covid 19 report) मिळण्यास उशीर होत आहे. (general hospital closed rt-pcr lab temporary satara marathi news)

जिल्ह्यामध्ये कृष्णा हॉस्पिटल व जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित शोधण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी होते. रॅट चाचणी निगेटिव्ह आलेल्यांची कोरोना पॉझिटिव्हिटी तपासण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे बाधितावर कोरोनाचे उपचार सुरू करता येत होते. पूर्वी तशी सुविधा नसल्याने लक्षणे असलेल्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविले जात होते. त्यामुळे अहवाल समजण्याला उशीर होत होता.

जिल्हा रुग्णालयात ही सुविधा सुरू झाल्यानंतर जास्त भार नसल्यास एका दिवसात अहवाल मिळू लागले. तपासणीच्या संख्या जास्त असल्यास काही वेळेला कोरोनाचा अहवाल मिळायला दोन दिवस लागत होते. पूर्वी चाचणी केल्यानंतर अहवाल घेण्यासाठीही जिल्हा रुग्णालयात किंवा चाचणी घेतलेल्या ठिकाणी यावे लागत होते; परंतु तांत्रिक सुधारणांमुळे नागरिकांना त्यांचे अहवाल मोबाईलवर एसएमएसद्वारे मिळू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांचा हेलपाटा वाचत होता.

जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये शासनाने कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध केली आहे. या ठिकाणी संकलित केलेले, तसेच जिल्हा रुग्णालयात घेतलेल्या बहुतांश स्वॅबची तपासणीही जिल्हा रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबमध्ये होते. दररोज दोन ते तीन हजार चाचण्या या ठिकाणी होत असतात. वेळेमध्ये चाचणीचा अहवाल मिळाल्यास नागरिकांवर उपचारांना लवकर सुरवात होते.

त्यामुळे रुग्ण गंभीर स्थितीत जाण्यापासून बचावतो; परंतु रविवारपासून (ता. 16) लॅबमधील यंत्रामध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे तपासणीसाठी घेतलेले नमुने मुंबईला पाठविण्यात आले आहेत. परिणामी, घेतलेल्या नमुण्यांचा अहवाल मिळण्यास एक दिवस उशीर होणार आहे, तसेच हे अहवाल मोबाईलवर एसएमएसद्वारे मिळणार नाहीत. त्यामुळे नागरिकांना ज्या ठिकाणी तपासणीचे नमुने दिले त्याच ठिकाणी जाऊन अहवाल पाहवा लागणार आहे.

लॅबमधील यंत्रामध्ये आलेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील यंत्रणेच प्रयत्न सुरू आहेत. दुरुस्तीनंतर यंत्राचा चाचणी घेऊन टेस्टिंग पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. रात्री उशिरा किंवा मंगळवारी ता.18 सकाळपर्यंत लॅब सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आजचे (साेमवार) नमुनेही दुसरीकडे पाठवावे लागण्याची शक्‍यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

Cannes 2024: हात फ्रॅक्चर तरीही कान्समध्ये दिसला ऐश्वर्याचा जलवा; लेक आराध्याचं 'या' कारणामुळे होतंय कौतुक

Neelam Gorhe : जातीय तेढीमुळे आत्महत्या वाढतात;नीलम गोऱ्हे,कृषी क्षेत्रातील चांगल्या गोष्टींकडेही लक्ष द्या

SCROLL FOR NEXT