सातारा

गुटखा विकणाऱ्या साता-यातील पाच जणांवर गुन्हा दाखल

प्रवीण जाधव

सातारा : बंदी असतानाही गुटखा, पानमसाला, तंबाखू आदींचा साठा व वितरण केल्याप्रकरणी पाच जणांवर शहर व शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे. याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी युवराज तात्याबा ढेंबरे यांनी फिर्याद दिली आहे.

सातारा-रहिमतपूर रस्त्यावर श्री साई पानशॉपवर टाकलेल्या छाप्यात चार हजार 901 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी कांताआप्पा भीमनआप्पा फुलारे (रा. संगम कॉलनी, गोडोली), विजय शंकर भोसले (रा. वृदांवन अपार्टमेंट, सातारा) व अभय बाबूराव मोहिते (रा. मंगळवार पेठ, सातारा) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक सी. एम. मछले तपास करत आहेत.
 
शाहूपुरी पोलिसांनीही सातारा शहर आणि परिसरात गुटखा, पानमसाला तसेच प्रोसेस्ड तंबाखू विकणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. महसूल भवनसमोर बस स्थानक परिसरात समीर इक्‍बाल शेख (रा. राजसपुरा पेठ, सातारा) याच्या बादशाह टपरीवर छापा टाकला. याप्रकरणी इम्रान हवालदार यांनी फिर्याद दिली आहे. अमोल महादेव चव्हाण (रा. म्हसवे, ता. सातारा) याची सातारा बस स्थानक परिसरात अमोल पानशॉप टपरी आहे. त्यावरही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी अनिल पवार यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक संजय पतंगे तपास करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loose Oil Sale Maharashtra : मोठा निर्णय! देवेंद्र फडणवीसांकडून तुकाराम मुंढेंच्या आदेशाला केराची टोपली? सुटे खाद्यतेल विक्रीला परवानगी

एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, नागपूर-बंगळुरू विमानाचे उड्डाण वेळेवर रद्द, प्रवाशांचा गोंधळ, नेमकं काय घडलं?

Australia A Squad: 'बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी'आधी ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय;३५ वर्षीय खेळाडूला दिले भारत दौऱ्याचे तिकीट!

कर्जाचा तगादा, पतीसह पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; पलूस तालुका हादरवणारी घटना

FDA Action : ‘ब्लिंक कॉमर्स’चा परवाना निलंबित! अस्वच्छतेच्या त्रुटी कायम; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

SCROLL FOR NEXT