Ekiv Waterfall Satara esakal
सातारा

40 फूट खोल दगडावर पडून जखमी युवतीचा साताऱ्यात मृत्यू

एकीवनजीक ४० फूट दगडावर पडून घडली दुर्घटना

सकाळ डिजिटल टीम

सातारा/कास : कासजवळील प्रसिद्ध एकीव गावातील पाबळ नावाचा धबधबा मैत्रिणींबरोबर पाहण्यासाठी आलेली सातारा येथील युवती दगडावर पडून जखमी झाली होती. काल रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला. श्वेता मुकुंद साठे (वय १८, रा. रामराव पवारनगर, गोडोली, शाहूनगर) असे मृताचे नाव आहे. धबधबा (Ekiv Waterfall Satara) पाहताना पाय घसरल्याने ४० फूट खोल दगडावर पडून तिच्या डोक्याला गंभीर स्वरूपात मार लागला होता. तिला सातारा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

धबधब्यामध्ये भिजत असतानाच श्वेताचा पाय घसरला अन् ती थेट दगडावर कोसळली.

या संदर्भात मेढा पोलिस ठाण्‍यात (Medha Police Station) या अपघाताची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. २१) दुपारी दोनच्या सुमारास साताऱ्यावरून श्वेता साठे ही चार ते पाच मैत्रिणींसमवेत एकीव पाबळ नावाच्या धबधब्यांमध्ये भिजण्यासाठी आल्या होत्या. धबधब्यामध्ये भिजत असतानाच श्वेताचा पाय घसरला. थेट दगडावर ती कोसळली.

त्यातच तिच्या डोक्याला गंभीर स्वरूपात मार लागल्याने ती बेशुद्ध पडली. घटनास्थळी असणाऱ्या स्थानिक नागरिकांनी तिला उपचारासाठी सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये (Satara Private Hospital) दाखल केले होते. रात्री उशिरा तिचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT