Mango
Mango esakal
सातारा

लॉकडाउनकाळात व्यापाऱ्यांनी फिरवली पाठ, आंबा खरेदीसाठी ग्राहकांनी धरली थेट बांधाची वाट

अरुण गुरव

मोरगिरी (सातारा) : कोरोनाच्या (Coronavirus) काळात शेतकऱ्यांची (Farmers) अवस्था बिकट असताना यंदा आंब्याने (Mango) शेतकऱ्यांना साथ दिली आहे. आंब्याचे उत्पादन वाढल्याने शेतकरी समाधानी आहेत. ऐन लॉकडाउनच्या (Lockdown) काळात आंब्याची मिळालेली साथ शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरत आहे. लॉकडाउनमध्येही आंबा थेट ग्राहकांपर्यंत पोचवत असल्याने ग्राहकांचाही आंबा खरेदीकडे कल वाढला आहे. मोरणा विभागातील शेतकऱ्यांना आंब्यामुळे अच्छे दिन आले आहेत. (Good Rate For Mango Crop In Morna Area Satara News)

मोरणा खोऱ्यातील शेतकऱ्यांनी शेतात फळझाडे लावली आहेत. त्यात हापूस, रत्ना, केशर आणि कलमी आंब्याचा समावेश आहे. कळकेवाडी, कोकिसरे, डावरी, मोरगिरी, पेठशिवापूर, माणगाव, आंब्रग, गोकुळ, धावडेत फळांची शेती वाढली आहे. गेल्या वर्षी वादळी वाऱ्याने परिसरातील आंब्याचे नुकसान झाले होते. यावर्षी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, तरीही नुकसान झाले नाही. 1800 ते 2000 रुपये शेकडा दर मिळू लागल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत.

परिसरात सध्या आंबा तोडणीच्या कामास वेग आला आहे. मध्यस्थ किंवा दलालांमार्फत आंब्याची विक्री यापूर्वी व्हायची. मात्र, लॉकडाउनमुळे त्यात खंड पडला आहे. त्यामुळे शेतकरी थेट ग्राहकांपर्यंत पोचत आहे. आंबा उतरण्याच्या कालावधीत गारपीट झाली नसती तर शेतकऱ्यांना यापेक्षा चांगले उत्पादन मिळाले असते. लॉकडाउनमध्ये व्यापारी, दलालांनी पाठ फिरवली असली तरी ग्राहकाने घरी येऊन आंबा खरेदी केल्याने कोरोनाच्या काळात आंब्याने आम्हाला तारले, असे पेठशिवापूरचे शेतकरी संजय हिरवे यांनी सांगितले.

Good Rate For Mango Crop In Morna Area Satara News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT