Gopichand Padalkar Dhangar Jagar Yatra Lonand esakal
सातारा

Dhangar Reservation : ..म्हणूनच शरद पवारांनी धनगर आरक्षणाला विरोध केला; पडळकरांनी सांगितलं कारण

धनगर समाजाला आरक्षण मिळाले, तर त्याचा पहिला फटका बारामतीला बसणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

साहेब, ताई, दादा, आबांचे खूळ डोक्यातून काढा, ही गुलाम बनवणारी यंत्रणा आहे.

लोणंद : धनगर समाजात (Dhangar Community) ऊर्जा यावी, त्यांच्यातील भीती दूर व्हावी, यासाठी कशाचीही पर्वा न करता कोणालाही जाऊन भिडतो आहे. तरीही भीती जाणार नसेल, तर भीती जाणार तरी कधी? साहेब, ताई, दादा, आबांचे खूळ डोक्यातून काढा, ही गुलाम बनवणारी यंत्रणा आहे. या पदांना प्रथम मूठमाती द्या, तरच तुम्हाला राजे होता येईल, असे स्पष्ट मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले.

गट, तट, पक्ष विसरून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात सर्वांनी एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केले. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या धनगर आरक्षणाच्या धनगर जागर यात्रेनिमित्त खंडाळा तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने लोणंद येथे राधेश्याम मंगल कार्यालयात आयोजित जाहीर सभेत आमदार पडळकर बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ नेते आनंदराव शेळके- पाटील, माजी सभापती रमेश धायगुडे -पाटील, युवा नेते अॅड. वैभव धायगुडे -पाटील, ऋषिकेश धायगुडे -पाटील, बापूराव धायगुडे, बाळासाहेब शेळके, ईश्‍वर ठोंबरे, किसन धायगुडे, तात्या शेंडगे आदी प्रमुख उपस्थित होते.

पडळकर म्हणाले, ‘‘धनगर समाजाला आरक्षण मिळाले, तर त्याचा पहिला फटका बारामतीला बसणार आहे. म्हणूनच शरद पवारांनी धनगर आरक्षणाला विरोध केला. धनगर व धनगड असा शब्दछल करत खो घालण्याचे काम केले.’’ आरेवाडी येथे (ता. २२) रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही यावेळी आमदार श्री. पडळकर यांनी केले. यावेळी आनंदराव शेळके- पाटील, अॅड. वैभव धायगुडे- पाटील यांचीही भाषणे झाली. बाळासाहेब शेळके यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डिझेल टँकरला बस धडकली, मदिनाला निघालेले हैदराबादचे ४२ यात्रेकरू होरपळले, फक्त बसचा ड्रायव्हर वाचला

Akbar: महिलेचं अपहरण करणं मुघलांना पडलं होतं महागात! औरंगजेबच्या पणजोबाची कबर खोदून हाडं कोणी जाळली?

Latest Marathi Breaking News : दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील अमीर रशीद अलीची १० दिवसांची कोठडी एनआयएकडे

मुख्यमंत्री फडणवीसांसमोर सत्कार करून घेतला, PMO सचिव निघाला तोतया; सोबत बॉडीगार्ड घेऊन फिरायचा, बीड-पुणे कनेक्शन समोर

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मुलाचं नाव अभिनय का ठेवलं? रेणुका शहाणे यांनी सांगितलं कारण, वाचून वाटेल अभिनेत्याचं कौतुक

SCROLL FOR NEXT