OBC Reservation VS Maratha Community  esakal
सातारा

Gram Panchayat Election : ओबीसींच्या 'या' जागांवर आता मराठा उमेदवारांचा दावा; कुणबी दाखला काढल्याने वाढली चुरस

ग्रामपंचायत निवडणुकीत काही गावांत ओबीसी सरपंच जागेसाठी आरक्षण जाहीर झालं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मराठा समाजाने कुणबी दाखला काढल्याने त्यांनी ओबीसी आरक्षित जागेवर दावा सांगितला आहे.

मोरगिरी : ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat Election) ओबीसी आरक्षण (OBC Reservation) पडलेल्या जागेवरती मराठा समाजाने (Maratha Community) मराठा कुणबी दाखला काढून त्यांनी ओबीसी आरक्षित जागेवर दावा सांगितला आहे. त्यामुळे निवडणूकपूर्व ओबीसी समाज दुखावला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत काही गावांत ओबीसी सरपंच जागेसाठी आरक्षण जाहीर झालं आहे; परंतु गावात ओबीसी समाज असताना तर काही ठिकाणी नसताना येथे मराठा कुणबी दाखला (Kunbi Certificate) काढून त्यांनी‌ ओबीसी आरक्षित जागेवर दावा सांगितल्याने मोरणा विभागातील ग्रामपंचायत निवडणुकीत ओबीसी समाज नाराज झाला आहे.

जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या पाटण तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींसाठी पाच नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे संभाव्य इच्छुक उमेदवार या ठिकाणी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत, तर काही ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपद महिला पुरुष असे ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.

निवडणूक लागलेल्या काही गावांत ओबीसी समाज नसल्याने तेथे ओबीसी आरक्षण पडल्याने अनेक इच्छुकांनी निवडणुकीत माघारी घेतली; परंतु काही ठिकाणी मराठा समाजाने मराठा कुणबी दाखला काढल्याने त्यांनी ओबीसी आरक्षित जागेवर दावा सांगितला आहे. त्यामुळे निवडणूकपूर्व ओबीसी समाज दुखावला आहे.

ओबीसी समाज आता एकसंध झाला आहे. बारा बलुतेदार असणारा हा समाज गावच्या अधीन आहे. कित्येक वर्षे झाले ओबीसी समाजाच्या मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. ग्रामपंचायत सरपंच सदस्‍य होऊन गावाला आणि समाजाच्या प्रश्नाला न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राजकारणात सहभाग घेवून ते‌ आपल्यालाच सोडवायचे आहेत, या जाणिवेतून ओबीसी समाज पाऊल टाकताना दिसत आहे.

राजकीय झोळी रिकामीच?

मोरणा विभागातील एका गटाच्या प्रमुख पदाधिकारी यांनी गाव बैठका घेऊन ओबीसी समाजाला दूर करून मराठा कुणबी दाखल्याचे समर्थन केल्याने मोरणा विभागातील ग्रामपंचायत निवडणुकीत ओबीसी समाजाची राजकीय झोळी रिकामीच राहिल्याने ओबीसी समाज नाराज झाला आहे, तर मराठा समाजाने कुणबी दाखला काढला असल्याने त्यांना ओबीसी आरक्षणातून आरक्षित जागेवर लढण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुल परिसरात अपघाताची मालिका सुरूच; तीव्र उतारावरून येणाऱ्या ४ ते ५ गाड्यांची धडक

Mokhada Accident:'पालघर- संभाजीनगर बसला अपघात'; 25 हुन अधिक प्रवासी जखमी, तिघे गंभीर..

Latest Marathi Breaking News: घाटकोपरच्या केव्हीके शाळेत पुन्हा विषबाधेचा प्रकार

Winter Care Tips : थंडीत तुमचा कूलर बनेल Room Heater! फक्त 130 रुपयांत 'हा' करा सोपा जुगाड

Viral Video: 'झटपट पटापट, रांगोळी काढा पटापट...' डॅनी पंडितच्या गाण्याने लोकांना लावलं वेड, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT